आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs SL: श्रीलंकेसमोर टीम इंडियाने उभारले 197 धावांचे \'शिखर\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( रोहितची झेल घेताना चमीरा.)
रांची - भारत श्रीलंकेमधील दुस-या टी - 20 सामन्‍यात भारताने सावध पण जोरदार सुरूवात करत अखेरच्‍या चेंडूपर्यंत 6 गड्यांच्‍या मोबदल्‍यात 196 धावा काढल्‍या. 11 षटकांमध्‍येच टीम इंडियाने शतक पूर्ण केले होते. भारताकडून सर्वाधिक 51 धावा शिखर धवनने काढल्‍या आहेत.
श्रीलंकेच्‍या परेराने 19 व्‍या षटकामध्‍ये शेवटच्‍या तीन चेंडूत सलग तीन बळी घेतले. हार्दिक पंड्या, सुरेश रैना नि युवराज सिंगला त्‍याने आऊट केले.
धवन- शिखर धवन 51 धावा काढून झेलबाद, भारताला पहिला झटका.
शर्मा- रोहित शर्माच्‍या रूपात दुसरा झटका, 43 धावानंतर झेलबाद.
रहाणे- 21 चेंडूत 25 धावा काढून रहाणे बाद झाला.
रैना- सुरेश रैनाने 19 चेंडूत 30 धावा काढल्‍या.
पंड्या- हार्दिक पंड्या 12 चेंडूत 27 धावा काढून बाद झाला.
युवराज - युवराज सिंग एकही धाव न काढता तंबूत परतला.
- नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
संक्षिप्तधावफलक...
ओव्‍हर- 20
धावा- 196
बाद गडी-
06
पहिल्‍या टी-20 मध्‍ये...
- पुण्यात झालेल्या पहिल्या टी-20 मध्‍ये लंकेने भारताचा 5 विकेट, 12 चेंडू राखून पराभव केला.
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली.
- श्रीलंकेच्या नवख्या गोलंदाजीसमोर भारताच्‍या संघाला पूर्ण 20 षटकंही खेळू दिले नाही.
- खराब सुरूवात केलेल्‍या भारताने लंकेसमोर 102 धावांचे आव्हान ठेवले होते.
-विजयासाठीचे हे माफक आव्हान लंकेने 18 षटकांत 5 बाद 105 धावा करीत पार केले.
असे आहेत दोन्‍ही संघ
भारत -
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराजसिंग, रवींद्र जडेजा, पवन नेगी, आर. अश्विन, आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, हरभजनसिंग, भुवनेश्वरकुमार.
श्रीलंका - दिनेश चांदिमल (कर्णधार), दुश्मंता चामिरा, एन. डिकवेला, तिलकरत्ने दिलशान, गुणाथिलाका, चामरा कापुगेदरा, तिसरा परेरा, सेकुगे प्रसन्ना, कसून राजिथा, सेनानायके, दासून शनाका, सिरिवर्धने, वेंडरसे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सामन्‍यातील फोटो....