रांचीच्या मैदानावर भारत-श्रीलंकादरम्यान दुसरा टी-20 सामना आज सायंकाळी 7.30 वाजेपासून सुरु होईल. हे धोनीचे होम ग्राउंड असल्याने चाहत्यांना त्याच्याकडून विषेश अपेक्षा आहेत. कारण मागील चार टी-20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 27 धावा केल्या आहेत, ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप दिलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात पाच विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. श्रीलंकेकडे सात नवीन चेहरे आहेत. त्यापैकी पाच जनांचा सामना करणे भारतीयांना कठीन जाणार आहे. एवढेच नाही तर, यांच्यासमोर स्टार प्लेयर्सचा भरणा असलेल्या भारतीय संघानेही गुडघे टेकले होते.
या 5 जनांचा सामना करू शकेल टीम इंडिया...
- मिलिंडा श्रीवर्दना (ऑलराउंडर)
- दसून शांका (ऑलराउंडर)
- कसून रजिथा (मध्यमगती गोलंदाज)
- दुशमांथा चमीरा (वेगवान गोलंदाज)
- निरोशन डिक्वेला (ओपनर)
हा आहे खरा प्रॉब्लेम : एक्साइटेड फॅन्स आणि धोनीची रुसलेली बॅट
- रांचीतील सर्वात मोठा हिरो मानल्याजाणाऱ्या धोनीला पाहण्यासाठी स्टेडिअम पूर्णपणे भरलेले राहण्याची शक्यता आहे.
- येथे धोनीलाही सिद्ध करावे लागेल. सध्या, त्याची खेळी बहरतांना दिसत नाहीये.
- पुण्यात त्याने केवळ दोन धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियात 3 टी-20 सामन्याच्या मालिकेत त्याला केवळ 25 धावाच करता आल्या.
- तेथे त्याची सर्वाधिक धावसंख्या केवळ 14 होती. खरेतर, भारताचा सर्वात यशस्वा कर्णधार आश्चर्याचा धक्का देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
असा ठरला पहिला सामना
- पहिल्या सामन्यात भारताने 10/101 धावा केल्या होत्या.
- श्रीलंकेने 5 विकेटने जिंकला होता सामना.
- डेब्यू स्टार रजिथा (3 विकेट) मॅन ऑफ द मॅच ठरला.
का विजय आहे आवश्यक
- भारताचा रांचीत पराभव झाला तर, मालीका पराभवाला जावेलागेल सामोरे.
- पराभवानिशी आशियाकपमध्ये उतरल्यास आत्मविश्वासात राहील कमी.
- पॉझिटिव्ह सुरुवात करण्यासाठी मालिकेत पुणरागमन आवश्यक
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, यांना रोखल्यास मिळू शकतो विजय...