आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs Sri Lanka Third Test LIVE, 1st Day In Pallekele IND Vs SL 3rd Test

लाेकेश राहुलची सलग सातव्या अर्धशतकाच्या विश्वविक्रमाशी बराेबरी; द्रविडला टाकले मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पल्लेकल- यजमान श्रीलंकेला क्लीन स्वीप देऊन नव्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी उत्सुक असलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या कसाेटीस दमदार सुरुवात केली. लाेकेश राहुल (८५) अाणि शिखर धवनच्या (११९) विक्रमी खेळीच्या बळावर भारताने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद ३२९ धावा काढल्या. भारताकडून लाेकेश राहुलने सलग सातव्या कसाेटी अर्धशतकाने विश्वविक्रमाची बराेबरी साधली. याशिवाय त्याने सलामीवीर शिखर धवनसाेबत टीम इंडियाला १८८ धावांच्या भागीदारी सलामी दिली. दिवसअखेर भारताचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (१३) अाणि हार्दिक (१) हे दाेघेही मैदानावर खेळत अाहेत. गाेलंदाजीमध्ये यजमान श्रीलंकेचा मलिंडा पुष्पकुमारा चमकला. त्याने तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाचा कसाेटी कर्णधार विराट काेहलीचे अर्धशतकाचे स्वप्न भंगले. तसेच भारताचे विश्वासु फलंदाज  अजिंक्य रहाणे (१७) अाणि चेतेश्वर पुजारा (८) स्वस्तात बाद झाले.  

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार विराट काेहलीचा हा निर्णय सलामीवीर शिखर धवन अाणि लाेकेश राहुलने याेग्य ठरवला. त्यांनी संयमी खेळीच्या बळावर यजमानांच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. यासह त्याने संघाला १८८ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. याशिवाय त्यांनी माेठ्या भागीदारीची नाेंद केली. त्यांनी २४ वर्षानंतर ही कामगिरी केली. 

एका धावेवर धवनला जीवनदान; ठाेकले शतक
भारताच्या शतकवीर शिखर धवनने मिळालेल्या संधीचे साेने करताना टीम इंडियाच्या धावसंख्येचा अालेख उंचावला. त्याला एका धावेवर जीवनदान मिळाले. हा टर्निंग पाॅइंट ठरला. याच संधीचा फायदा करत त्याने शानदार शतकी खेळी केली. त्याने १०७ चेंडूंत १०० धावा पूर्ण केल्या. यासह त्याने ११९ धावांचे याेगदान दिले. 

काेहलीचे अर्धशतक हुकले
विराट काेहलीचे अर्धशतक हुकले. त्याला सदानकनने झेलबाद केले. काेेहलीने ८४ चेंडूंचा सामना करताना ३ चाैकारांसह ४२ धावांची खेळी केली.  अश्विनने ३१ धावांचे याेगदान दिले.
- ११९ धावांची शिखर धवनची खेळी  
- ८५ धावांचे लाेकेश राहुलचे याेगदान  
- १८८ धावांची धवन-राहुलची भागीदारी  
- ०३ विकेट पुष्पकुमाराच्या

पुजारा, अजिंक्य रहाणेची निराशा
भारताच्या चेतेश्वर पुजारा अाणि अजिंक्य रहाणेने तिसऱ्या कसाेटीतील पहिल्या डावात निराशा केली. या दाेघांनाही समाधानकारक खेळी करता अाली नाही. चेतेश्वर पुजाराने ८ धावा काढून तंबू गाठला. तसेच रहाणेने १७ धावांची खेळी केली.

लाेकेश राहुलची बराेबरी 
- भारताचा युवा फलंदाज लाेकेश राहुलने सलामीला साजेशी खेळी करताना शानदार अर्धशतक ठाेकले. यासह त्याने अापली सलग अर्धशतकी खेळीची माेहीम कायम ठेवली. यातून त्याला सलग सात कसाेटी अर्धशतकाच्या विश्वविक्रमाशी बराेबरी साधता अाली. त्याने ९०, ५१, ६७, ६०, ५१*, ५७, ८५ अशी खेळी केली. यामध्ये त्याने विंडीजच्या एवर्टन विक्स, शिवनारायण चंद्रपाॅल, झिम्बाब्वेच्या फ्लावर, श्रीलंकेच्या कुमार संगकारा अाणि अाॅस्ट्रेलियाच्या क्रिस राॅजर्सच्या कामगिरीशी बराेबरी साधली अाहे. या प्रत्येकाच्या नावे सलग सात कसाेटी अर्धशतकाची नाेंद अाहे.   

लाेकेशने द्रविड, गुंडप्पा विश्वनाथला टाकले मागे
युवा फलंदाज लाेकेश राहुलने सलग सात अर्धशतकी खेळी करताना अापल्याच देशाच्या माजी कसाेटीपटू राहुल द्रविड अाणि गुंडप्पा विश्वनाथ यांना मागे टाकले. या दाेघांच्या नावे प्रत्येकी सहा कसाेटी अर्धशतकाची नाेंद अाहे.   

विक्रमाची नाेंद
- शिखर धवनचे हे श्रीलंकेमधील तिसरे शतक ठरले. या शतकी खेळीसह त्याने कमी डावात वेगवान शतकामध्ये संयुक्तपणे दुसरे स्थान गाठले.  त्याने सात डावांमध्ये हा पराक्रम गाजवला. त्याच्यासाेबत विंडीजचा लारा हा दुसऱ्या स्थानी अाहे.  यामध्ये सचिन अाणि चेतेश्वर पुजारा संयुक्तपणे अव्वल स्थानावर अाहे. त्यांच्या नावे प्रत्येकी ५ डावात वेगवान तीन शतकांची नाेंद अाहे.   
- शिखर धवनचे हे या मालिकेतील दुसरे शतक अाहे. यासह ताे श्रीलंकेच्या खेळपट‌्टीवर एकाच मालिकेत दाेन शतके ठाेकणारा सहावा सलामीवीर फलंदाज ठरला. यापूर्वी, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, जयसूर्या, दिलशानच्या नावे या कामगिरीची नाेंद अाहे. धवनचे हे सहावे कसाेटी शतक ठरले. यामधील पाच शतके ही त्याने विदेशात अाणि एक शतक भारतात झळकावले.

२४ वर्षांनंतर रचली सर्वात माेठी भागीदारी 
शिखर धवन अाणि लाेकेश राहुलने श्रीलंकेविरुद्ध कसाेटीमध्ये विदेशी टीमने पहिल्याच दिवशी माेठी भागीदारी रचली. २४ वर्षांनंतर ही भारताची पहिल्या विकेटसाठी केलेली विक्रमी भागीदारी ठरली. त्यांनी १८८ धावांची भागीदारी केली. यामध्ये त्यांनी नवज्याेत सिद्धू अाणि मनाेजने १९९३ मध्ये पहिल्या गड्यासाठी १७१ धावांची भागीदारी केली हाेती.
बातम्या आणखी आहेत...