आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचे मिशन वर्ल्डकप; श्रीलंकेचा प्रवेश अडचणीत; वनडे मालिका अाजपासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाम्बुला - विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अाता अागामी ‘मिशन २०१९ वर्ल्डकप’च्या तयारीला सुरुवात करणार अाहे. यासाठी भारताचे खेळाडू सज्ज झाले अाहेत. दुसरीकडे श्रीलंकेचा या वर्ल्डकपमधील प्रवेश अडचणीत येण्याची शक्यता अाहे. थेट प्रवेशासाठी यजमानांची नजर मालिकेतील दाेन वनडे सामन्यांतील विजयाकडे लागली अाहे. कसाेटीपाठाेपाठ अाता वनडेतही क्लीन स्वीप देऊन श्रीलंकेचे वर्ल्डकपचे तिकीट कापण्याचा भारताचा प्रयत्न असेल.   

टीम इंडिया या मिशनला अाता वनडे मालिकेतून सुरुवात करेल. भारत अाणि यजमान श्रीलंका यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात हाेणार अाहे. यातील सलामीचा सामना  दाम्बुलाच्या मैदानावर  अायाेजित करण्यात अाला. कसाेटीपाठाेपाठ अाता वनडे मालिका विजयाच्या इराद्याने काेहली अँड कंपनी मैदानावर उतरेल. दुसरीकडे यजमान टीम वनडे मालिका विजयासाठी प्रयत्नशील राहण्याची शक्यता अाहे.   

अडीच वर्षांपासून श्रीलंकेचा दबदबा : अडीच वर्षांपासून भारताविरुद्ध वनडेत श्रीलंकेचा दबदबा कायम राहिला अाहे. यात श्रीलंकेने वनडेत भारतावर मात केली. श्रीलंकेेने नाेव्हेंबर २०१४ मध्ये यजमान भारताला रांचीच्या मैदानावर पराभूत केले हाेते.
 
दाेन विजयांनी श्रीलंकेला वर्ल्डकपचे तिकीट : यजमान श्रीलंका अाता भारताविरुद्ध वनडे मालिकेतून अागामी २०१९ च्या वर्ल्डकपमधील प्रवेशासाठी उत्सुक अाहे. यासाठी यजमानांना दाेन विजयांची गरज अाहे. मात्र, यजमानांचा हा प्रवेश अडचणीत सापडण्याची शक्यता अाहे. कारण टीम इंडियाने गत कसाेटी मालिकेत यजमानांना विजयाचे खाते उघडू दिले नाही. त्यामुळे अात वनडेतही भारताने याच कामगिरीला उजाळा दिल्यास श्रीलंकेला वर्ल्डकपमध्ये प्रवेश करता येणार नाही.

भारताचा पाच वर्षांनंतर श्रीलंकेत वनडे
भारतीय संघ  पाच वर्षांनंतर श्रीलंकेमध्ये वनडे सामना खेळणार अाहे. यापूर्वी २०१२ मध्ये भारताने पल्लेकलच्या मैदानावर यजमानांविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला हाेता. यादरम्यान भारताने २० धावांनी सामना जिंकला हाेता. अाता याच कामगिरीला पाच वर्षांनंतर उजाळा देण्याचा भारताचा मानस अाहे.  

श्रीलंकन खेळाडूंवर बिस्किटाची बंदी
श्रीलंकन खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये बिस्किटे खाण्यावर बंदी घालण्यात अाली अाहे. संघ व्यवस्थापक असंगा गुरुसिन्हा यांनी ही घाेषणा केली. खेळाडूंच्या फिटनेससाठी हा निर्णय घेण्यात अाला. फिजिओचा हा निर्णय खेळाडूंसाठी  महत्त्वाचा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.  

पुढील स्‍लाइडवर... धाेनी विक्रमाच्या उंबरठ्यावर
बातम्या आणखी आहेत...