आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs WI: भारताला 162 धावांची आघाडी, लोकेश राहुलचे द्विशतक हुकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने केवळ सहा कसोटीत करिअरमधील तिसरे शतक ठोकल्यानंतर असा आनंद व्यक्त केला. - Divya Marathi
भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने केवळ सहा कसोटीत करिअरमधील तिसरे शतक ठोकल्यानंतर असा आनंद व्यक्त केला.
किंगस्टन- लोकेश राहुलच्या 158 धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटीत पहिल्या डावात 5 बाद 358 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे दुस-या दिवसअखेर आता 162 धावांची आघाडी आहे. पहिल्या कसोटीप्रमाणेच या कसोटीतही भारत मजबूत स्थितीत दिसत आहे. दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणे (42) आणि रिद्धिमान साहा (17) खेळत होते. त्याआधी यजमान वेस्ट इंडिजचा संघ केवळ 196 धावांत आटोपला होता. असा राहिला दुस-या दिवसाचा खेळ...
- रविवारी मॅचच्या दुस-या दिवशी भारताने 1 बाद 126 धावावरून पुढे खेळण्यास सुरूवात केली.
- पुजारा (46), लोकेश राहुल (158), विराट कोहली (44) आणि आर. अश्विन (3) धावा काढून बाद झाले.
- यादरम्यान वेस्ट इंडिजच्या गेब्रिएल, रोस आणि बिशू यांना एक-एक विकेट मिळाली.
- दुस-या दिवशी भारताने 88 षटकात 4 गडी गमावत एकून 232 धावा जोडल्या.
अशा पडल्या भारताच्या विकेट...
- मॅचच्या दुस-या दिवशी चेतेश्वर पुजाराच्या रूपाने भारताला दुसरा झटका बसला.
- 46 धावावर असताना पूजारा एक चोरटी धाव काढताना रोस्टन चेसच्या थ्रो नर धावबाद होऊन परतला.
- भारतला तिसरा झटका दमदार बॅटिंग करत असलेल्या लोकेश राहुल (158) रूपाने लागला.
- लोकेशची बॅटिंग पाहून वाटत होते की तो द्विशतक नक्कीच झळकावेल.
- मात्र, राहुल शैनन गेब्रिएलच्या गोलंदाजीवर विकेटकीपर शेन डोरिककडे झेल देऊन बाद झाला.
- यानंतर चौथी विकेट कर्णधार विराट कोहलीची गेली. तो रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर चंद्रिकाकडे झेल देऊन परतला.
- कोहलीने 90 बॉलमध्ये 44 धावा काढल्या. यात त्याने 4 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
- त्यानंतर थोड्याच वेळात आर. अश्विन (3) सुद्धा बाद झाला. त्याला देवेंद्र बिशूने lbw केले.
- मॅचच्या पहिल्या दिवशी भारताची केवळ एक विकेट पडली होती. शिखर धवन 27 धावा काढून बाद झाला होता.
भारताकडून अशा राहिल्या भागीदारी-
- पहिल्या विकेटसाठी शिखर धवन आणि लोकेश राहुलने 87 धावांची सलामी दिली.
- दुस-या विकेटसाठी चेतेश्वर पुजाराने लोकेश राहुलसोबत 121 धावा जोडल्या.
- तिस-या विकेटसाठी लोकेश राहुल आणि विराट कोहली यांच्यात 69 धावांची भागीदारी झाली.
- चौथ्या विकेटसाठी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यात केवळ 33 धावांची भागीदारी झाली.
- पाचव्या विकेटसाठी आर. अश्विन आणि अजिंक्य रहाणेने केवळ 17 धावा जोडल्या.
- सहाव्या विकेटसाठी अजिंक्य रहाणे (42) आणि वृद्धीमान साहाने (17) दिवसअखेर नाबाद 31 धावांची भागीदारी केली होती.
आर. अश्विनचा पुन्हा 'पंच'-
- भारताकडून गोलंदाजीत आर. अश्विनने 52 धावांत इंडिजचे 5 गडी बाद केले.
- अश्विनने इंडिजला पुन्हा एकदा 'पंच' देत सॅम्युअल्स, ब्लॅकवूड, डॉरविच, होल्डर, बिशू यांना बाद केले.
- अश्विनने केवळ 16 षटके गोलंदाजी करताना 52 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट घेऊन वेस्ट इंडिजला पहिल्या डावात अवघ्या 52.3 षटकांत 196 धावांवर रोखण्यात सिंहाचा वाटा उचलला.
- विंडिजविरुद्ध सलग दुस-या सामन्यात अश्विनने 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली.
- अश्विनने पहिल्या कसोटीतील दुस-या डावात 7 बळी टिपले होते.
- वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने 10 षटकांत 53 धावांत 2 गडी बाद करून अश्विनला चांगली साथ दिली.
- वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 23 धावांत 2 विकेट घेतल्या.
पुढे स्लाईडद्वारे जाणून, किंगस्टन कसोटीत घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...