आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी कसाेटी : नवख्या चेसने ‘पाणी’ पाजले!, टीम इंडियाच्या मेहनतीवर पाणी; दुसरी कसोटी ड्रॉ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंग्जस्टन - सलग दुसऱ्या कसाेटीत विजय संपादन करण्याच्या टीम इंडियाच्या अाशेवर पाणी फेरल्या गेले. भारत अाणि यजमान वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरी कसाेटी अनिर्णीत राहिली. राेस्टन चेसच्या (१३७) शतकाच्या बळावर विंडीजने अापला लाजिरवाणा पराभव टाळून कसाेटी ड्राॅ केली. या वेळी भारताने केलेली मेहनत अपयशी ठरली.

भारताने सलामीला विजय संपादन करून चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी मिळवलेली अाहे. तिसऱ्या कसाेटीला ९ अाॅगस्टपासून सुरुवात हाेईल. लाेकेश राहुल (१५८), अजिंक्य रहाणे (नाबाद १०८), चेतेश्वर पुजारा (४६) अाणि वृद्धिमान साहाच्या (४७) शानदार फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात धावांचा डाेंगर रचला. भारताने ९ बाद ५०० धावांवर अापला पहिला डाव घोषित केला. यासह भारताला पहिल्या डावात ३०४ धावांची अाघाडी घेता अाली. तत्पूर्वी, भारताने अवघ्या १९६ धावांत यजमान विंडीजचा पहिला डाव गुंडाळला. अश्विन, ईशांत व शमीने अव्वल गाेलंदाजीच्या बळावर भारताला हे यश मिळवून दिले. दरम्यान, पावसाचा व्यत्यय अाला. त्यामुळे चाैथ्या दिवशी १५.५ षटकांपर्यंत खेळ हाेऊ शकला. त्यानंतर पाचव्या व शेवटच्या दिवशी ब्लॅकवूड (६३), डाेरविच (७४) व चेसने हाेणारी पडझड थांबवली. दरम्यान, डाेरविच व चेसने १४४ धावांची भागीदारी केली. हाेल्डर व चेस अभेद्य १०३ धावांची भागीदारी रचली.
संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज : पहिला डाव : १९६, दुसरा डाव : ३८८, भारत : पहिला डाव : ५०० (डाव घाेषित).
बातम्या आणखी आहेत...