आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

T-20 मध्‍ये 3 वर्षांत वेस्ट इंडीजला नमवण्यात भारत अपयशी, एकमेव सामना आज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंगस्टन - रविवारी होणाऱ्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध मागच्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानावर उतरेल. २३ मार्च २०१४ पासून भारताला टी-२० मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध एकही विजय मिळवता आला नाही. तेव्हापासून आतापर्यंत यांच्यात तीन टी-२० सामने झाले. यात दोन वेस्ट इंडीजने जिंकले, तर एकाचा निकाल लागला नाही. भारत व वेस्ट इंडीज यांच्यात सात टी-२० सामने झाले आहेत. यात चारमध्ये कॅरेबियनने विजय मिळवला तर भारताने दोन विजय आणि एक सामना अनिर्णीत राहिला.  

दोन्ही संघ असे  
भारत
: विराट  कोहली (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, उमेश यादव.  
 
वेस्ट इंडीज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), एविन लेविस, क्रिस गेल, मार्लोन सॅम्युअल्स, जेसन मोहम्मद, चॅडविक वाल्टन, रोवमान पॉवेल, सुनील नारायण, जेरोम टेलर, बद्री, के. विल्यम्स.
बातम्या आणखी आहेत...