आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची मजबूत आघाडी; कोहलीचे ४४ धावांचे याेगदान, रहाणेचे नाबाद अर्धशतक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्धशतकादरम्यान चौकार खेचताना भारताचा अंजिक्य रहाणे. - Divya Marathi
अर्धशतकादरम्यान चौकार खेचताना भारताचा अंजिक्य रहाणे.
किंगस्टन - युवा सलामीवीर लोकेश राहुलच्या शानदार शतकापाठाेपाठ अजिंक्य रहाणेच्या (७४) नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात लंच टाइमपर्यंत १५१.४ षटकांत ६ बाद ४२५ धावा काढल्या. भारताकडे आता एकूण २२९ धावांची आघाडी झाली असून टीम इंडियाच्या अद्याप ४ विकेट शिल्लक आहेत.
भारताने साेमवारी तिसऱ्या दिवशी ५ बाद ३५८ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. अजिंक्य रहाणे अाणि वृद्धिमान साहाने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. संयमी खेळी करताना रहाणेने शानदार अर्धशतक ठाेकले. त्याने १७६ चेंडूंचा सामना करताना ११ चाैकार अाणि १ चाैकाराच्या अाधारे ७४ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने वृद्धिमान साहासाेबत सहाव्या विकेटसाठी ९८ धावांची माेठी भागीदारी केली. याशिवाय या दाेघांनी टीमच्या धावसंख्येला गती दिली. त्यामुळे भारतीय संघाला माेठी अाघाडी घेता अाली. दरम्यान, अर्धशतकापासून अवघ्या तीन पावलावर असलेला साहा पायचीत झाला. त्याला विंडीजचा कर्णधार जेसन हाेल्डरने बाद करून टीमला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या साहाने ११६ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकाराच्या अाधारे ४७ धावांची खेळी केली. मात्र, अवघ्या तीन धावांची त्याचे अर्धशतक हुकले. त्याने रहाणेला महत्त्वाची साथ देत टीमच्या धावसंख्येचा अालेख उंचावला.

दरम्यान, विंडीजच्या गाेलंदाजांना रहाणे अाणि साहाला राेखण्यासाठी माेठी कसरत करावी लागली. मात्र, भारताच्या या दाेघांनी संयंमी खेळी करत गाेलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. याशिवाय त्यांनी पहिले सत्रही गाजवले. अखेर, यजमान टीमच्या कर्णधार हाेल्डरने साजेशी खेळी करत ही जाेडी फाेडली. त्याने साहाला पायचीत केले. त्याचा या कसाेटीतला हा पहिला बळी ठरला.

गावसकर, मंकड यांच्या क्लबमध्ये राहुल
>राहुलने सबिना पार्क मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या डावात १५८ धावा काढल्या. हे त्याच्या कारकीर्दीतील तिसरे शतक आहे. राहुलने सलामीवीर म्हणून आपली तिन्ही शतके विदेशात झळकावली. अशी कामगिरी फक्त गावसकर आणि विनू मंकड यांनाच करता आली आहे.
>भारताचा युवा फलंदाज लाेकेश राहुलने यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघाविरुद्ध शतक झळकावले. गावसकर यांनी आपले सुरुवातीची आठ शतके विदेशात झळकावली होती, तर मंकड यांनी तीन शतके विदेशात ठाेकल्याची नाेंद अाहे.

अात्मविश्वास वाढला
दोन महिन्यांपासून मी सलगपणे कामगिरी करतोय. माझा ही लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेन. तिन्ही स्वरूपात चांगले प्रदर्शनाचा माझा प्रयत्न असेल. यामुळे निश्चितपणे माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी यापुढेसुद्धा योगदान देत राहणार.
- लोकेश राहुल.
बातम्या आणखी आहेत...