आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs ZIM: पहिला सामना जिंकला, पण या 5 बाबींवर संघाने लक्ष द्यावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झिम्‍बाब्‍वेच्‍या विकेटनंतर आनंद साजरा करताना टीम इंडिया. - Divya Marathi
झिम्‍बाब्‍वेच्‍या विकेटनंतर आनंद साजरा करताना टीम इंडिया.
टीम इंडियाने अटीतटीच्‍या लढतीत यजमान झिम्‍बाब्‍वेला पराभूत करून आपला विजय सिद्ध केला. संघाने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीदेखिल मिळवली. झिम्‍बाब्‍वेच्‍या विजयासाठी शेवटच्‍या छटकात दहा धावांची गरज होती, मात्र भुवनेश्‍वरच्‍या शानदार बॉलिंगने भारताला विजय मिळाला. अन्‍यथा चिंगबुराला थोडी जरी संधी मिळाली असती तर सामना झिम्‍बाब्‍वेच्‍या घशात असता. शिवाय रायडू, बिन्‍नी आणि अक्षर पटेल यांची कामगिरी सोडली, तर इतर खेळाडूंचा फार प्रभाव दिसला नाही. त्‍यामुळे भारतीय संघांला पाच विशेष बाबींवर संघाला लक्ष द्यावे लागेल.
या आहेत पाच बाबी
1 ध्‍येय-धोरणावर लक्ष केंद्रित
2. वरच्‍या फळीतील फलंदाजीत सुधारणा
3. बॉलिंगमध्‍ये हवी धार
4 भज्‍जीकडून अपेक्षा भंग
5 संघात नाही दिसली आक्रमकता
1 ध्‍येय-धोरणावर लक्ष केंद्रित
रॉबिन उथप्‍पा हा आक्रमक फलंदाज ओपनिंगला असूनही सामन्‍यात अजिक्‍य राहणेचे ओपनिंगला उतरणे धोरणाला धरून नव्‍हते. वेगवान उथप्‍पा याने आधीही भारतासाठी ओपनिंग केली आहे. त्‍यामुळे राहणे मधल्‍या फळीत खेळता असता, तर फायदा झाला असता. कारण तो शिखर आणि राेहितच्‍या उपस्‍थितीत मधल्‍या फळीतच उतरतो. 'सुरूवात खराब झाली मात्र शेवटी आम्‍ही संयमाने काम घेतले म्‍हणून विजय मिळाला' अशी प्रतिक्रीया शेवटी कर्णधार राहणे यांनी दिली.
पुढील स्‍लाईडवर पहा कोणत्‍या बाबींकडे आहे लक्ष देण्‍याची गरज..