आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs ZIM - दुस-या एकदिवसीय सामन्‍यासाठी टीम इंडिया सज्‍ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झिम्बाब्वेवर अवघ्या चार धावांनी विजय मिळविणारा भारतीय संघ रविवारी दुसरा एकदिवसीय सामना खेळण्‍यासाठी तयार आहे. हरारे येथे दिनांक १२ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.
यजमान झिम्बाब्वेने पहिल्‍या सामन्‍यात केलेली जोरदार सुरूवात भारतीय संघाला भारी पडणार होती. मात्र, रायडू, बिन्‍नीची दमदार फलंदाजी आणि भुवनेश्‍वरची शेवटच्‍या छटकातील गोलंदाजी संघासाठी प्रभावी ठरली आहे. पहिल्‍या सामन्‍यात झालेल्‍या चुका टाळल्‍यास रविवारी भारतीय संघ धावांचा डोंगर उभारू शकतो. त्‍यामुळे वरच्‍या फळीतील खेळाडूंना सुधारणा करावी लागणार आहे.