आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंडीजविरुद्ध कसाेटी मालिका- अश्विनने सचिन, सेहवागला टाकले मागे; काेहलीही सरस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाेर्ट अाॅफ स्पेन- जगातील नंबर वन गाेलंदाज अार. अश्विनने अापल्या अव्वल कामगिरीच्या बळावर सरस असल्याचे दाखवून दिले. त्याने विंडीजविरुद्ध मालिकेतील उल्लेखनिय कामगिरीच्या बळावर सचिन तेंडुलकर अाणि वीरेंद्र सेहवागलाही मागे टाकले. त्यांच्यापेक्षाही सरस कामगिरीची नाेंद त्याने अापल्या नावे केली. त्याने सहाव्यांदा मालिकावीर पुरस्काराचा बहुमान पटकवला. त्याने विंडीजविरुद्ध चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेत हा पराक्रम गाजवला. त्यामुळे भारताच्या मालिका विजयात अश्विनची कामगिरी सर्वाेत्कृष्ट ठरली. याशिवाय कसाेटी कर्णधार विराट काेहलीनेही मालिका गाजवली. त्याने २५१ धावांची (एका द्विशतकासह) नाेंद करून फलंदाजीमध्ये अव्वल स्थान गाठले. टीम इंडियाने ही मालिका २-० ने अापल्या नावे केली.
‘भारतीय संघाच्या विजयात याेगदान देणे हे नेहमीच महत्त्वपूर्ण ठरते. त्याचा मला अभिमान वाटताे. याशिवाय सांघिक खेळीमुळे मला हे शक्य हाेते. त्यासाठी केलेल्या मेहनतीचे फळही मला दिसून येते. अाक्रमक खेळण्याच्या इराद्याने अाम्ही दाैऱ्यावर अालाे हाेताे. त्यामुळेच पाच गाेलंदाजांना खेळवण्याचा नवा प्रयाेगही यशस्वीपणे साकारला गेला. या दाैऱ्यात टीममधील वातावरणही अधिक उत्साही हाेते. त्यामुळेच सरस कामगिरी करण्यासाठीची प्रेरणा मिळाली,’ अशी प्रतिक्रिया भारताच्या अार.अश्विनने दिली.
सचिन ५ वेळा मानकरी
विंडीजविरुद्ध मालिकेपूर्वी सर्वाधिक वेळा मालिकावीरचा बहुमान पटकावण्याची सरस कामगिरी सचिन तेंडुलकर अाणि वीरेंद्र सेहवागच्या नावे हाेती. या दाेघांनीही प्रत्येकी पाच वेळा हा बहुमान मिळवला. जागतिक स्तरावर यामध्ये श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन हा अव्वल स्थानावर अाहे. त्याची सर्वाधिक ११ वेळा मालिकावीर म्हणून निवड झाली.
काेहली चमकला
भारताकडून काेहलीने विंडीजविरुद्ध मालिका गाजवली. त्याची फलंदाजी उल्लेखनीय ठरली. त्याला ६२.७५ च्या सरासरीने सर्वाधिक २५१ धावांचे महत्त्वपूर्ण याेगदान देता अाले. याशिवाय टीम इंडियाकडून अजिंक्य रहाणे (२४३) हा दुसऱ्या व लाेकेश राहुल (२३६) तिसऱ्या स्थानावर राहिला. तसेच फलंदाजीत अश्विन (२३५) चाैथ्या अाणि साहा (२०५) पाचव्या स्थानावर राहिले.
सहा वेळा पटकावला मालिकावीर बहुमान
अश्विनने मालिकेत दाेन शतकांच्या अाधारे २३५ धावांची नाेंद केली. त्याने ३६ व्या कसाेटीत हे यश संपादन केले. त्याने १३ कसाेटी मालिकांत प्रतिनिधित्व केले अाहे. यातील ७ मालिका विजयात अश्विनचे माेलाचे याेगदान राहिले. या सातपैकी सहा कसाेटी सिरीजमध्ये अश्विनला मालिकावीरचा बहुमान मिळाला.
बातम्या आणखी आहेत...