(फोटो ओळ- लोकेश राहूल करिअरचे दुसरे शतक ठोकल्यानंतर आनंद व्यक्त करताना.)
कोलंबो - भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने 87.02 शटकांत 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 319 धावा केल्या. यात लोकेश राहुलचे शानदार (108) शतक,
विराट कोहली (78) आणि रोहित शर्मा (79) अर्धशतकांचा समावेश आहे.
तत्पूर्वी श्रीलंकन संघ पहिला कसोटी सामना जिंकून तीन कसोटी्ंच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
लोकेश आणि विराटची 164 धावांची दमदार भागीदारी
भरताने नानेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला सुरूवातिलाच मुरली विजय (0) आणि अजिंक्य राहणे (4) यांच्या रुपात दोन धक्के बसले. त्यांना धम्मिका प्रसादने बाद केले. मात्र त्यानंतर मैदानात उतरलेल्या लोकेश राहूल आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध सुरूवात करत डाव सावरला. लोकेश राहूलने (108) शानदार शतक ठोकले. तर कर्णधार विराट कोहलीने 78 धावांची खेळी करत कारकिर्दितील 11वे अर्ध शतक ठोकले. लोकेश आणि विराटने तिसर्या विकेटसाठी दमदार 164 धावांची भागीदारी केली. तिसर्या विकेटच्या रुपात हेराथने विराटला बाद केले.
विराट बाद झाल्यावर मैदानावर उतरलेल्या रोहित शर्मासह लोकेश राहूलने चौथ्या विकेटसाठी 55 धावांची पार्टनरशिप केली. लोकेशला चमीराने चांडीमलच्या करवी झेलबद केले. तो बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेला स्टुअर्ट बिन्नी फार काळ मैदानावर टिकाव धरू शकला नाही. त्याला केवळ 10 धावाच करता आल्या. पाचव्या विकेटच्या रुपात हेराथने त्याला चमीराच्या हाते झेलबाद केले.
बिन्नी बाद झाल्यावर वृद्धिमान साहासह रोहित शर्माने पुन्हा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो 132 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार लगावत 79 धावा करुन तो बाद झाला. त्याला मॅथ्यूजने बाद केले.
कोलंबोच्या पी. सारा. ओव्हल स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यानंतर श्रीलंकेचा कुमार संगकारा क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार आहे. त्यामुळे या लाडक्या फलंदाजाला निरोपाप्रसंगी विजयी सलामी देण्याचा प्रयत्न श्रीलंकेचा संघ करेल. तर पहिल्या सामन्यात आघाडी मिळूनही झालेल्या पराभवानंतर, भारतीय संघ प्रतिष्ठा म्हणून हा सामना जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याशी संबंधित फोटो...