आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Women Tour Of Australia, 2nd T20I: Australia Women V India Women At Melbourne

वुमंस क्रिकेट T-20: कोल्हापूरची अनुजा पाटील ऑस्ट्रेलियात चमकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - भारताच्या महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T-20 मालिकेत दमदार विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्‍या मालिकेवर मिताली राजच्या संघाने 2-0 अशा फरकाने ताबा मिळवला. मेलबर्नमधील दुसऱ्या T-20 मध्‍ये भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियन महिला संघावर 10 विकेट राखून विजय मिळवला. कोल्‍हापूरच्‍या अनुजा पाटील हिने या मालिकेत चमकदार कामगिरी केली.
अनुजाची दमदार कामगिरी
-
अडलेडच्या मैदानावर पहिल्या T-20 मध्‍ये भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला.
- ऑस्ट्रेलियन महिलांचे 141 धावांचे लक्ष्य मिताली राजच्या टीम इंडियाने 5 गडी राखून पार केले.
- सामन्यात कोल्हापूरच्या अनुजा पाटील हिची कामगिरी दमदार राहिली.
- अनुजाने आधी गोलंदाजीत 3 षटकांत 16 धावा देत एक विकेट घेतली.
8 चेंडूत नाबाद 14 धावा..
- ऑस्ट्रेलियाने उभारलेला धावांचा डोंगर पार करणे भारताला कठीण झाले होते.
- अनुजाच्‍या फटकेबाजीमुळे धावांचा डोंगर गाठता आला.
- अनुजाने हरमनप्रीत कौरलाही उत्तम साथ दिली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली.
- हरमनप्रीत कौरच्‍या रूपात भारताला मोठा धक्‍का बसला. ती 46 धावांवर बाद झाली.
- अनुजाने शिखा पांडेच्या साथीने भारताला दमदार विजय मिळवून दिला.
- अनुजाने दणदणीत दोन चौकार ठोकले. 8 चेंडूत तीने नाबाद 14 धावा केल्‍या.
दुसऱ्या सामन्यात...
- मेलबर्नवर झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिलांच्या दुसऱ्या सामन्यात, भारताने विजय मिळवला.
- या सामन्यातही अनुजा पाटीलने उत्‍कृष्‍ठ गोलंदाजी करण्‍याचा प्रयत्‍न केला.
- अनुजाने 3 षटकांत 20 धावा दिल्या. मात्र तिला विकेट मिळवता आली नाही.
5 वेळा रणजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
- अनुजा पाटील ही सलग 4 वेळा मानाच्या चॅलेंजर्स ट्राफी स्पर्धेत खेळली आहे.
-अनुजा महिला T-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतही खेळली आहे.
-अनुजाची 5 वेळा रणजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली होती.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, सामन्‍यातील काही खास फोटो...