आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची अजिंक्य वारी!:भारताचा ५४ धावांनी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे- युवा खेळाडू रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने झिम्बाब्वेमधील ‘अजिंक्य’ वारी कायम ठेवली. भारतीय संघाने शुक्रवारी यजमान झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० सामन्यात शानदार विजयाची नाेंद केली. भारताने ५४ धावांनी सलामीचा सामना जिंकला. यासह भारताने दाेन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा टी-२० सामना रविवारी हाेणार अाहे. शानदार तीन बळी घेणारा युवा गाेलंदाज अक्षर पटेल सामनावीरचा मानकरी ठरला.
अजिंक्य रहाणे (३३) अाणि मुरली विजय (३४) यांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना यजमानांसमाेर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात यजमान टीमने सात गड्यांच्या माेबदल्यात १२४ धावांपर्यत मजल मारून घरच्या मैदानावर पराभव पत्करला. अक्षर पटेल, हरभजनसिंगने शानदार गाेलंदाजी करून भारताला विजय मिळवून दिला. यजमान टीमकडून मसकदजाने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली.
खडतर अाव्हानाच्या प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने दमदार सुरुवात केली. सलामीच्या मसकदजा (२८) अाणि चिभाभा (२३) यांनी संघाला ५५ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यासह त्यांनी टीमला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, हरभजनसिंगने भारताला पहिला बळी मिळवून दिला. त्याने ८.१ षटकांत चिभाभाला मनीष पांडेकरवी झेलबाद केले. झिम्बाब्वेच्या चिभाभाने २७ चेंडूंमध्ये २३ धावा काढल्या. यात दाेन चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. तसेच मसकदजाने २४ चेंडूंचा सामना करताना एक चाैकार अाणि दाेन षटकारांच्या अाधारे २८ धावांची खेळी केली. त्यानंतर काेव्हेर्टीने १० धावा काढून तंबू गाठला. त्याला हरभजनसिंगने बाद केले. सिकंदरला देखील फार काळ अाव्हान कायम ठेवता अाले नाही. त्याने १० धावांची खेळी करून तंबु गाठला.

वनडे मालिकेतील विजयी माेहीम अबाधित ठेवण्याच्या इराद्याने टीम इंडिया सलामीच्या टी-२० सामन्यात मैदानावर उतरली. नाणेफेक जिंकून अजिंक्य रहाणेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या वेळी कर्णधार अाणि सलामीवीर रहाणे अाणि मुरली विजयने संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर राॅबिन उथप्पाने नाबाद ३९ धावांचे महत्त्वपूर्ण याेगदान दिले. याशिवाय त्याने मनीष पांडेसाेबत (१९) तिसऱ्या गड्यासाठी ४५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर केदार जाधव (९) व स्टुअर्ट बिन्नी (११) तंबूत परतले. हरभजनसिंगने नाबाद ८ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने गाेलंदाजीतही चांगली खेळी केली.
पदार्पणात अक्षरची धारदार गाेलंदाजी
भारताच्या अनुभवी हरभजनसिंग अाणि युवा खेळाडू अक्षर पटेलने धारदार गाेलंदाजी केली. हरभजनने चार षटकांमध्ये २९ धावा देत दाेन बळी घेतले. दुसरीकडे युवा गाेलंदाज अक्षर पटेलने पदार्पणात संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने चार षटकांत १७ धावा देत तीन गडी बाद केले. त्याने यजमानांचे अव्वल फलंदाज बाद केले. यासह अक्षर पटेल हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. याशिवाय माेहित शर्माने एक बळी घेतला.
{ राॅबिन उथप्पाने टीम इंडियाकडून सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने पांडेसाेबत तिसऱ्या गड्यासाठी ४५ धावांची भागीदारी केली.
धावफलक
भारत धावा चेंडू ४ ६
रहाणे झे. मसकदजा गो. क्रेमर ३३ ३२ २ ०
मुरली विजय धावबाद ३४ १९ ५ १
रॉबिन उथप्पा नाबाद ३९ ३५ २ ०
पांडे झे. सिकंदर गो. राजा १९ १९ १ १
जाधव झे. मसकदजा गो. मपोफू ०९ ०७ १ ०
बिन्नी झे. क्रेमर गो. मपोफू ११ ०६ ० १
हरभजनसिंग नाबाद ०८ ०३ १ ०
अवांतर : २५. एकूण : २० षटकांत ५ बाद १७८. गडी बाद होण्याचा क्रम : १-६४, २-८२, ३-१२७, ४-१५०, ५-१६६. गोलंदाजी : उत्सेया ४-०-३०-०, मपोफू ४-०-३३-३, मुझराबनी ३-०-३६-०, मॅडझिव ४-०-४६-०, क्रेमर ४-१-२०-१, सिकंदर १-०-२-०.
झिम्बाब्वे धावा चेंडू ४ ६
मसकदजा झे. जाधव गो. पटेल २८ २४ १ २
चिभाभा झे. पांडे गो. हरभजन २३ २७ २ १
कॅव्हेन्ट्री झे. रहाणे गो. हरभजन १० १० ० १
चिगुम्बुरा त्रि. गो. पटेल ०१ ०३ ० ०
सिकंदर राजा त्रि. गो. पटेल १० १७ ० ०
एव्हिने धावबाद ०२ ०८ ० ०
क्रेमर त्रि. गो. संदीप शर्मा ०९ १४ ० ०
उत्सेया नाबाद १३ ०७ १ १
मॅडझिव नाबाद १४ १० १ १
अवांतर : १४. एकूण : २० षटकांत ७ बाद १२४. गडी बाद होण्याचा क्रम : १-५५, २-६४, ३-६६, ४-६८, ५-८२, ६-९०, ७-९८. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-२२-०, संदीप शर्मा ३-०-३४-०, मोहित शर्मा ३-०-८-१, अक्षर पटेल ४-०-१७-३, हरभजनसिंग ४-०-२९-२, स्टुअर्ट बिन्नी २-०-८-०.
अजिंक्य-मुरलीची अर्धशतकी भागीदारी

अजिंक्य रहाणे -मुरली विजय यांनी संघाला ६४ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. मुरली विजयने १९ चेंडूंत ३४ धावा काढल्या. याशिवाय अजिंक्य रहाणेने ३२ चेंडूंत ३३ धावांची खेळी केली.
बातम्या आणखी आहेत...