आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची नऊ विजयांसह अाॅस्ट्रेलियाशी बराेबरी; भारताने गाजवला श्रीलंका दाैरा; टी-२० सामनाही जिंकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलंबाे- सलगच्या मालिका विजयाने अात्मविश्वास बुलंदीवर असलेल्या कर्णधार विराट काेहलीने एका नव्या कामगिरीला गवसणी घातली. त्याने अापल्या नेतृत्वाखाली श्रीलंका दाैऱ्यामध्ये भारताला नऊ विजय मिळवून दिले. यासह भारताने अाॅस्ट्रेलियन टीमच्या कामगिरीची बराेबरी साधली. भारताने यंदाच्या सत्रातील या दाैऱ्यात एकूण नऊ विजय संपादन केले. यामध्ये कसाेटी मालिकेतील ३, वनडे मालिकेतील पाच अाणि एकमेव टी-२० सामन्यातील एका विजयाचा समावेश अाहे. अशीच कामगिरी अाॅस्ट्रेलियाने २००९-१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध केली हाेती. यामध्येही अाॅस्ट्रेलियाने तीन कसाेटी, पाच वनडे अाणि एका टी-२० सामन्यात विजयश्री खेचून अाणली हाेती.   

काेहली यशस्वी कर्णधार 
टीम इंडियाचा विराट काेहली हा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. त्याने अापल्या कणखर नेतृत्वाखाली टीम इंडियाला मालिकेमध्ये सलग नऊ विजय मिळवून दिले. असे करणारा ताे भारताचा पहिला कर्णधार ठरला. त्याने दाैऱ्यामध्ये भारताला कसाेटी मालिकेत ३-० ने, वनडे मालिकेत ५-० अाणि एकमेव टी-२० सामन्यात १-० ने एकतर्फी विजय मिळवून दिला. यजमान श्रीलंके टीम पुर्णपणे अपयशी ठरली. 

अाता मिशन अाॅस्ट्रेलिया
श्रीलंका दाैऱ्यातील घवघवीत विक्रमी यशानंतर अाता टीम इंडिया अापल्या घरच्या मैदानावर खेळणार अाहे. यासाठी भारताने पुढच्या अाठवड्यापासून मिशन अाॅस्ट्रेलिया मालिका विजय ठेवले अाहे. हे मिशन यशस्वी करण्याचा मानस कर्णधार विराट काेहलीने व्यक्त केला. यामध्ये भारतीय संघ पाच वनडे अाणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...