आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Won The Toss And Choose To Bat First In First Test Against Bangladesh

Ind vs Ban Test : पावसामुळे सामन्यात अडथळा, शिखर धवनच्या 74 धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - बांगलादेश दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी भारताच्या बिनबाद 107 धावा झाल्या होत्या. शिखर धवनने शानदार अर्धशतक पूर्ण करत 74 धावा केल्या आहेत. तर मुरली विजयच्या 30 धावा झाल्या आहेत.
त्याआधी भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनने मैदानावर सुरुवातीची दोन षटके शांतपणे खेळली. पण त्यानंतर त्याने चौकारांची बरसात करायला सुरुवात केली. 47 चेंडूत त्याने 53 धावा केल्या असून त्यात 10 चौकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजुने मुरली विजय त्यासाथ देण्याचे काम करत आहे. मात्र 23 व्या षटकानंतर पावसामुळे खेळात व्यत्यय आला आहे.
या कसोटीद्वारे हरभजन सिंग अनेक दिवसांनंतर कसोटीमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

दोन्ही संघ खालील प्रमाणे

बांगलादेश : तमित इकबाल, इमरुल कायस, मोमिनुल हक, मुशफिकर रहीम, शाकिब अल हसन, सौम्य सरकार, लिटन दास, शुवागता होम, झुबेर हसन, ताईजुल इस्लाम, मोहम्मद शाहीद.
भारत : शिखर धवन, मुरली विजय, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य राहणे, वृद्धीमान साहा, आर अश्विन, हरभजन सिंग, उमेश यादव, इशांत शर्मा, वरुन अॅरोन.
पुढील स्लाइड्सवर पाहा सामन्याचे PHOTOS