आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND v AUS: वेगवान खेळपट्टीवर धोनीची कसोटी, जाणून घ्या, कोण कुणाला ठरू शकतो वरचढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संघ वन डे आणि टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया येथे पोहोचला आहे. विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. एकदिवसीय मालिकेची सुरुवात 12 जानेवारीला पर्थमध्ये होण्याऱ्या पहिल्या सामन्याने होईल. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीवन स्मिथ पहिल्यांदाच धोनीच्या नेतृत्वाचा सामना करताना दिसेल. नेतृत्व आणि आकडेवारीवर नजर टाकली तर धोनी स्मिथपेक्षा सरस असल्याचे स्पष्ट होते.
ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या कोणकोणत्या खेळाडूंमध्ये रंगणार सामना...
- धावांचा विचार करता भारताचा विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरमध्ये चुरस पाहायला मिळू शकते.
- ऑस्ट्रेलियन संघात दोन नवोदित वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला असून, फिरकीपटूंची कमी जानवते.
- आर. अश्विन सध्या जबरदस्त लयीत असून क्रमांक 1 चा कसोटी गोलंदाज आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्टीवर मो. शमी कशाप्रकारे पुनरागमन करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड येथे झालेल्या विश्वचषक-2015 मध्ये त्याने 17 बळी घेतले होते.
- या शिवाय इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनाही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून चांगलीच टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचा एक दिवसीय संघः
स्टीवन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जॉर्ज बेल्ली, स्कॉट बोलांड, जोश हेजलवुड, जेम्स फॉकनर, अॅरॉन फिंच, मिचेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, जोएल पॅरिस, मॅथ्यू वेड.

भारताचा एकदिवसीय संघः
एमएस धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, आर. अश्विन, मो. शमी, अक्षर पटेल, उमेश यादव, गुरकीरत मानसिंग, रिषी धवन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, बरिंदर सरन

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
पाच सामन्यांची एक दिवसीय मालिका
पहिला सामना : 12 जानेवारी, पर्थ
दुसरा सामना : 15 जानेवारी, ब्रिस्बेन
तिसरा सामना: 17 जानेवारी, मेलबर्न
चौथा सामना: 20 जानेवारी, कॅनबरा
पाचवा सामना: 23 जानेवारी, सिडनी
तीन सामन्यांची टी-20 मालिका
पहला सामना : 26 जानेवारी, अॅडिलेड
दुसरा सामना : 29 जानेवारी, मेलबर्न
तिसरा सामना : 31 जानेवारी, सिडनी

पुढील स्लाइड्सवर पाहा, भारत आणि ऑस्ट्रेलियान खेळाडूंची वन डे कामगिरी आणि जाणून घ्या कोण कुणावर आहे वरचढ...