न्यूजर्सी- भारतीय वन डे आणि टी-20 क्रिकेट टीमचा कर्णधार
महेंद्रसिंह धोनी सध्या अमेरिकेत आहे. समोर आलेल्या फोटोनुसार, तो तेथे त्याच्या मित्रांबरोबर मस्ती करत आहे. टेस्टमधून रिटायरमेंट घेतलेला धोनी रिअल लाइफमध्येही फार कूल आणि फनी आहे. ही गोष्ट तर सुरेश रैनानेही कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये फॅन्ससमोर शेअर केली होती.
धोनीच्या आधी साक्षीनेही सोशल मिडियावर आपला एक फोटो शेअर केला होता. तिने लिहिले होते की, ते 'अटलांटिक सिटी एयर शो' एन्जॉय करत आहेत. धोनीने सोमवारी न्यूजर्सी येथील सिद्धि विनायक मंदिरातही पूजा केली होती. तेव्हापासून हे कपल येथेच आहे. या दरम्यान धोनीचा बेस्ट फिनिशर म्हणून न्यूजर्सी येथे सत्कारही करण्यात आला.
इंडिया-एसाठी खेळणार धोनी-विराट
पुनरागमनानंतर महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली बांगलादेश-एविरुद्ध भारत-एकडून खेळतील. भारत-ए आणि बांगलादेश-ए यांच्यात 3 वन डे आणि 2 तीन दिवसीय सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने बेंगळुरू येथे होतील. विराट कोहली शिवाय या संघात वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू हे देखील इंडिया-एसाठी खेळतील. वन डे मॅच 16, 18 आणि 20 सप्टेंबरला होणार असून, 22 ते 24 सप्टेंबरदरम्यान पहिला तीन दिवसीय सामना होइल तर, 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान दुसरा तीन दिवसीय सामना खेळला जाइल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल साइटवर धोनीने शेअर केलेले काही नवीन फोटो...