आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: टीम इंडिया बांगलादेशात, धोनीनंतर विराटची पहिली टेस्ट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- एक कसोटी सामना व तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारतीय संघ आज बांगलादेशात दाखल झाला. ढाक्यातील एयरपोर्टवर भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण टीम हॉटेलात रवाना झाली. हरभजन सिंग एयरपोर्टवर कर्णधार विराट कोहलीसमवेत होता. आपल्याला माहित असेलच की, विराटने हरभजनसिंगला संघात स्थान द्यावे अशी मागणी केली होती.
येत्या 10 जूनपासून एकमेव कसोटी सामना सुरु होत आहे. टीम इंडिया रविवारीच बांगलादेशात दाखल होणार होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौ-यामुळे टीम इंडिया एक दिवसात उशीरा दौ-यावर गेली.
दरम्यान, महेंद्रसिंग धोनीच्या कसोटी निवृत्तीनंतर कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून विराट कोहलीकडे धुरा दिली आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यात भारताचा 3-1 असा कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर धोनीने कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता कसोटी संघाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर येऊन पडली आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून विराटचा हा पहिलाच दौरा आहे व या एकमेव कसोटीत विराटची टेस्ट घेतली जाणार आहे. विराटने हरभजन सिंग संघात असावा अशी शिफारस केली होती. त्यामुळे सहा डावखुरे फलंदाज असणा-या बांगलादेश संघाविरोधात हरभजनची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा, ढाक्यात भारतीय संघाचे कसे थाटात स्वागत झाले...
बातम्या आणखी आहेत...