आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा श्रीलंकन क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नी, हा क्रिकेटर्स पत्नीमुळे राहतो चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिलहारा फर्नांडो पत्नी एरेशा फर्नांडोसोबत... - Divya Marathi
दिलहारा फर्नांडो पत्नी एरेशा फर्नांडोसोबत...
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौ-यावर बुधवारीच कोलंबोत दाखल झाला. भारतीय संघ लंकेत तीन कसोटी, पाच वन डे सामने तर एक टी-20 सामना खेळेल. श्रीलंकन क्रिकेटर दिलहारा फर्नांडो बुधवारी 38 (19 जुलै 1979) वर्षाचा झाला. दिलहारा श्रीलंकनमधील एक मोठा खेळाडू आहे. भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी लंकेचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, झिंम्बाब्बेसारख्या दुबळ्या संघाविरूद्ध वन डे मालिका गमावल्यामुळे अनेक जुन्या खेळाडूंना वगळण्यात आले होते. त्यामुळे दिलहाराची भारताविरोधात निवड होते की नाही ते पाहावे लागेल. मात्र फर्नांडो आपल्या देशासाठी सर्वात वेगवान गोलंदाज राहिला आहे. त्याचे क्रिकेटर होणे हा प्रवास सुद्धा आश्चर्यचकित करणारा आहे. बास्केटबॉल खेळता-खेळता बनला क्रिकेटर...
 
- दिलहारा फर्नांडोने सध्या क्रिकेटर म्हणून आपल्याला माहित असला तरी तो शालेय जीवनात बास्केटबॉल खेळायचा.
- तसेच त्याला एक बास्केटबॉल खेळाडू म्हणूनच करिअर करायचे होते. 
- अनेक वर्षे बास्केटबॉल खेळता खेळता त्याची उंची आणि बॉडी स्ट्रक्चर खूपच चांगली झाली. 
- याचा फायदा त्याला तेव्हा झाला जेव्हा तो नोकरी शोधू लागला. 
- त्याचे शरीर, उंची पाहून त्याला कॉलेजमध्ये क्रिकेट कोचचा जॉब मिळाला. 
- यानंतर त्याची क्रिकेटमधील रूची वाढत गेली व एक दिवस श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघात जाऊन पोहचला.
 
असे राहिले करिअर-
 
- दिलहाराने 40 कसोटी सामने खेळले त्यात त्याने 100 विकेट घेतल्या आहेत. 
- तर 147 वनडे सामने खेळला असून यात त्याने 187 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. 
- फर्नांडोला 18 टी-20 सामन्यांचा अनुभव आहगे ज्यात त्याने 18 विकेट घेतल्या आहेत.
 
बायकोमुळे राहतो नेहमी चर्चेत-
 
- दिलहारा फर्नांडोच्या बायकोचे नाव एरेशा फर्नांडो आहे. जी सध्या गृहिणी आहे. 
- दिलहारा आणि एरेशा यांना तीन मुले आहेत. ज्यात दोन मुली व एक मुलगा आहे. 
- एरेशा खूपच फॅशनेबल आणि हिंडणे-फिरणे तिला फारच आवडते. यामुळे दिलहारा तिला अनेक ठिकाणी घेऊन जातो. 
- एरेशाच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये खूप सारे फोटोज आहेत. मात्र त्यात दिलहारा खूपच कमी फोटोत दिसतो. 
- दिलहाराच्या बायकोशिवाय इतर श्रीलंकन क्रिकेटर्सच्या बायकाही खूपच सुंदर आहेत. 
- श्रीलंकन क्रिकेटर्स आपल्या बायकोसोबत स्पेशल वेडिंग फोटोशूटसाठी ओळखले जातात. 
- मात्र, दिलहारा फर्नांडोचा असा कोणताही वेडिंग फोटोशूट नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, श्रीलंकन इतर क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नी...
बातम्या आणखी आहेत...