आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका दौरा | कोहलीच्या नेतृत्वात भारताचा कसोटी संघ लंकेत दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत आणि यजमान श्रीलंकेदरम्यान पहिल्या कसोटीला १२ ऑगस्टपासून सुरुवात होईल. विराट कोहली कर्णधार म्हणून पहिल्यांदा फुलटाइम मालिकेत खेळेल. मालिका जिंकण्याचे कठीण आव्हान त्याच्यासमोर असेल. मागच्या २२ वर्षांत भारताला श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. भारताकडून लंकेच्या भूमीवर मालिका जिंकण्याचे श्रेय फक्त मो. अझरुद्दीनला जाते. या महत्त्वाच्या मालिकेसाठी टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली आहे.

भारतीय कर्णधारांबाबत बोलायचे झाल्यास सौरव गांगुली विदेशात सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. असे असतानासुद्धा सौरवला श्रीलंकेत श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय मिळवता आला नाही. भारताचा आणखी एक कसोटी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाला आयसीसी क्रमवारीत नंबर वनच्या सिंहासनावर पोहोचवले. मात्र, त्यालासुद्धा लंकेत मालिका जिंकता आली नाही.
भारतीय क्रिकेट संघात उत्तम ऑलराउंडरची उणीव कित्येक वर्षांपासून आहे. मात्र, ही उणीव रविचंद्रन अश्विन भरून काढू शकतो, असा विश्वास कसोटी कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला.

अझहर विजयी कर्णधार
११९३ मध्ये भारताने श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर १-० ने पराभूत करून मालिका जिंकली होती. त्या वेळीसुद्धा तीन सामन्यांची मालिका होती. ही मालिका वगळली तर यानंतर भारताने श्रीलंकेचा दौरा केला तेव्हा पदरी पराभवच पडला किंवा मालिका ड्रॉ झाली.

हा अनुभव येईल कामी :
हरभजनसिंग : ९ सामने, २५ विकेट
ईशांत शर्मा : ६ कसोटी, १३ विकेट
अमित मिश्रा : १ कसोटी, ४ विकेट
मुरली विजय : २ कसोटी, ९९ धावा.

भारतीय कसोटी संघ श्रीलंकेत दाखल
टीम इंडियाचे खेळाडू सोमवारी श्रीलंकेत दाखल झाले. भारतीय संघ आगामी कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करत अाहे. कोलंबो येथे भारतीय संघातील खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया १२ ऑगस्टपासून सुरू हाेणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत नशीब आजमावणार आहे.

दौऱ्याचा कार्यक्रम असा
- श्रीलंका अध्यक्ष एकादश वि. भारत,
६ ऑगस्ट.
- भारत-श्रीलंका पहिली कसोटी,
१२ ऑगस्टपासून.
- भारत-श्रीलंका दुसरी कसोटी,
२० ऑगस्टपासून.
- भारत-श्रीलंका तिसरी कसोटी,
२८ ऑगस्टपासून.
मालिका जिंकूच..
माझ्या या संघात युवा आहेत. आम्हा सर्वात जोश आणि उत्साह आहे. आम्ही ड्रॉने समाधान मानणारे नाही. मालिका जिंकूच.
विराट कोहली, कर्णधार, टीम इंडिया.

श्रीलंकेने घरच्या मैदानावर भारताविरुद्ध सहापैकी तीन कसोटी मालिका जिंकल्या
१९८५ कपिलने मालिका गमावली : भारताने पहिल्यांदा १९८५ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली संघाने तीन कसोटी सामने खेळले. मात्र, भारताने मालिका १-० ने गमावली.
१९९३ अझहर ठरला यशस्वी : अझहरच्या नेतृत्वात एसएससी कोलंबोत झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने २३५ धावांनी सामना जिंकला. त्या वेळी भारताचा हा विदेशातील २७ सामन्यांत पहिला विजय होता. या मालिकेतील उर्वरित दोन सामने ड्रॉ झाले.

१९९७ सचिनने केली मालिका ड्रॉ : सचिनच्या नेतृत्वात भारताने १९९७ मध्ये श्रीलंकेत दोन कसोटी खेळल्या. मात्र, हे दोन्ही सामने ड्रॉ झाले. विजय मिळाला नाही.

२००१ गांगुलीने मालिका गमावली: सौरव गांगुलीच्या चमत्कारिक नेतृत्वाला श्रीलंकेला त्यांच्या भूमीवर नमवण्यात अपयश आले. भारताने मालिका २-१ ने गमावली.

२००८ कुंबळेनेही दोन सामने गमावले: अनिल कुंबळेच्या नेतृत्वात टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने गमावले. त्या वेळी भारताने एक सामना जिंकला होता.

२०१० धोनीकडूनही ड्रॉ: धोनी कर्णधार असताना भारताचा मालिका पराभव झाला नाही. मात्र, धोनी विजयसुद्धा मिळवून देऊ शकला नाही. तीन सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत सुटली.
बातम्या आणखी आहेत...