आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricket Team's Progress In Test, Jadeja On 13 No.

कसोटी क्रमवारीत भारतीयांची प्रगती, जडेजा १३ व्या क्रमांकावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - बंगळुरू कसोटी ड्रॉ झाल्यानंतर घोषित झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी प्रगती केली आहे. भारताचा डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने कारकीर्दीतील सर्वोतम रँकिंग मिळवताना गोलंदाजांच्या यादीत १३ वे स्थान गाठले अाहे. ऑस्ट्रेलियाचा निवृत्त झालेला गोलंदाज मिशेल जॉन्सनने नवव्या स्थानाने करिअरला निरोप दिला आहे. चार रणजी सामन्यांत ३८ िवकेट घेऊन जडेजाने निवड समितीला त्याची निवड करण्यास भाग पाडले. त्याने पहिल्या कसोटीत ८ बळी, तर बंगळुरूत ४ विकेट घेतल्या होत्या. भारताचा आॅफस्पिनर रविचंद्रन अश्विन पाचव्या क्रमांकावर आहे. अश्विननेही या मालिकेत १२ विकेट घेतल्या आहेत. फलंदाजांच्या यादीत भारताचा सलामीवीर मुरली विजयने प्रगती साधताना १२ वे स्थान गाठले. फलंदाजांच्या यादीत आफ्रिकेचा ए.बी. डिव्हिलर्स अव्वलस्थानी आहे. भारताचा एकही फलंदाज टॉप-१० मध्ये नाही. मुरली विजयनंतर चेतेश्वर पुजारा १४ व्या क्रमांकावर आहे.