आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियाच्या शिलेदारांचा कुंबळे सरांकडून क्लास! दिवसाची सुरूवात योगाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली योग करताना... - Divya Marathi
विराट कोहली योग करताना...
बंगळुरू- भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडीज दौ-यावर जात आहे. त्यासाठी सध्या बंगळुरूमध्ये टीम इंडियाचे प्रॅक्टिस सेशन सुरु आहे. जेथे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियातील खेळाडू जोरदार घाम गाळत आहेत.
दरम्यान, या प्रॅक्टिसदरम्यान खेळाडूंनी कधी कसून सराव केला तर कधी हसत-खेळत मौजमस्ती केली. कुंबळे सरांनी भारतीय संघातील शिलेदारांना योगा करण्यासही भाग पाडले. मानसिक संतुलन राखण्यासाठी योगाचा उपयोग होतो. आता कुंबळे सरांनी हा योग मंत्र भारतीय संघातील खेळाडूंसाठी दिला आहे.
बंगळुरुतील सराव सत्राच्या तिस-या दिवशी भारतीय खेळाडूंनी दिवसाची सुरुवात योगने केली. याचे फोटो भारतीय क्रिकेट संघाच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आले आहेत. कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियाचे सगळेच खेळाडू या सत्रात सहभागी झाले होते.
पुढे स्लाईडच्या माध्यमातून पाहा, विराटसह खेळाडूंनी कसा केला योगा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...