आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricketer Manoj Tiwari With Wife Sushmita Roy

पत्नीसह हॉलिडेवर क्रिकेटर मनोज तिवारी, शेअर केले हे ग्लॅमरस PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(क्रिकेटर मनोज तिवारी पत्नी सुष्मिता रॉयसह हॉलिडे एन्जॉय करत आहे.)
आजवर क्रिकेटर एमएस धोनीची पत्नी आणि विराट कोहली-दिनेश कार्तिक यांच्या गर्लफ्रेंड, त्यांच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत होत्या. मात्र आता आणखी एका क्रिकेटरच्या पत्नीचे फोटो काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. हा क्रिकेटर आहे कोलकत्याचा मनोज तिवारी. मनोज सध्या पत्नी सुष्मिता रॉयसह हॉलिडे एन्जॉय करत आहे.
हॉलिडेवर सुष्मिता-मनोजः
नुकताच झिंम्बाब्वे टूरवर गेलेला क्रिकेटर मनोज तिवारी सध्या पर्सनल लाइफमध्ये व्यस्त आहे. तो पत्नीसह मालदीव येथे सुट्या एन्जॉय करत आहे. त्याचे बरेच फोटो मनोज आणि त्याची पत्नी सुष्मिता यांनी आपापल्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना सोशल मीडियावर जबरदस्त लाइक्स मिळत आहेत.
मॉडेल्ससारखे अंदाजः
सुष्मिता या फोटोमध्ये एखाद्या ग्लॅमरस मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही. तिचा लूक, बॉडी लँग्वेज आणि पर्सनॅलिटी एखाद्या मॉडेलसारखीच आहे. सुष्मिताचे इंस्टाग्राम अकाउंटदेखील तिच्या ग्लॅमरस फोटोजने खचा-खच भरले आहे. त्यात ती, कधी तिचा पती मनोज तिवारीसह, तर कधी एखाद्या मित्रासोबत दिसते.
2013 मध्ये झाला यांचा विवाहः
मनोज आणि सुष्मिता यांनी सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर जुलै 2013 मध्ये लग्न केले. दोघांचीही ओळख एका कॉमन मित्राच्या सहायाने झाली. 2012 मध्ये आयपीएलच्या एका मॅचच्यामध्ये मुंबई इंडियन्सचा बॉलर लसिथ मलिंगाच्या एका बॉलवर सिक्सर लगावल्यानंतर सुष्मिताने मनोजला लग्नासाठी होकार दिला होता.
मनोज तिवारीचे क्रिकेट करिअरः
या 29 वर्षीय क्रिकेटरचे करिअर दुखापतीमुळे फार चांगले राहिले नाही. मनोजने जुलैमध्ये झालेल्या झिंम्बाब्वे टूरवर तीन वनडेमध्ये केवळ 34 धावाच केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 12 वनडेमध्ये 287 धावाच केल्या आहेत. 104* या बेस्ट स्कोरसह त्याच्या नावे एक शतक आणि एक अर्धशतकही आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मनोज तिवारी आणि त्याची पत्नी सुष्मिताचे सुट्या एन्जॉय करतानाचे काही खास फोटो...