आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricketer Virender Sehwag Retires From International Cricket

वीरेंद्र सेहवागचा सर्व प्रकारच्‍या क्रिकेटला \'अलविदा\', IPL मध्येही खेळणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- भारताचा धडकाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. एवढेच नाही तर यापुढे तो आयपीएलमध्येही खेळणार नाही. या आधी तो म्हणाला होता की, तो दुबईहून भारतात आल्यावर या निवृत्‍तीबाबत घोषणा करेल. पण, सेहवागने आचानक ट्विटर अकाउंटवरून निवृत्तीची घोषणा केली. सेहवागने लिहिले, 'मी आज क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून आणि आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करत आहे.' वीरूसाठी आज खास दिवस आहे. तो आज 37 वा जन्मदिवस साजरा करत आहे.
केले होते निवृत्तीचे खंडन
काल अचानकपणे वीरेंद्र सेहवागच्या रिटारमेंटची बातमी आली आणि या बातमीमुळे एकच खळबळ उडाली. मात्र, आपण अद्याप या प्रकारचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगत त्याने या चर्चेवर पडदाही टाकला होता. तो हे ही म्हणाला होता की, मी दुबईहून भारतात परतल्यानंतर या विषयावर निर्णय घेईल. खरे तर तो आज या संदर्भात काही तरी घोषणा करेलच असा कयास माध्यमांतून लावला जात होता.
सहवागची क्रिकेट कारकिर्द...
- 251 वन डेमध्ये 8273 धावा केल्या आहेत. यात 15 सेंच्युरीज आणि 38 हाफ सेंच्युरीजचा समानेश.
- 104 टेस्टमध्ये 8586 धावा. 23 सेंच्युरी आणि 32 हाफ सेंच्युरीजचा समावेश.
- या बरोबरच वीरूने 19 टी-20 सामन्यांमध्ये 394 धावा केल्या आहेत.
फॉरमॅटमॅचधावा10050विकेट
टेस्ट1048586233240
वन डे2518273153896
टी 2019394020
पुढील स्लाइड्सवर वाचा, सेहवागने पत्राद्वारे काय मांडलेली भूमिका... काय होती त्याची इच्छा... हे आहेत त्याच्या नावावरील खास विक्रम...