आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Cricketers Celebration After Win In Test Series Against New Zealand

टेस्टमध्ये नंबर 1: क्रिकेटर्सनी असा केला जल्लोष, ICC गदा दिसली सर्वांच्या हातात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामना संपल्यानंतर आयसीसीकडून सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला कसोटीत नंबर वन बनल्यामुळे कर्णधार विराट कोहलीला कसोटीची गदा सोपवली. - Divya Marathi
सामना संपल्यानंतर आयसीसीकडून सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला कसोटीत नंबर वन बनल्यामुळे कर्णधार विराट कोहलीला कसोटीची गदा सोपवली.
इंदूर- टीम इंडियाने होळकर स्टेडियमवर तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडला 321 धावांनी पराभूत करून मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप केले. भारताने आपल्या 48 वर्षांच्या इतिहासात चौथ्यांदा तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केले. सामना संपल्यानंतर आयसीसीकडून सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला कसोटीत नंबर वन बनल्यामुळे कर्णधार विराट कोहलीला कसोटीची गदा सोपवली. यानंतर भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला. सर्वांनी आपल्या हातात आयसीसीची नंबर-1 ची गदा हातात घेऊन पोझ दिली व फोटो क्लिक केले. खेळाडूंनी असा केला जल्लोष....
- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सामन्यानंतर आयसीसीकडून सुनील गावसकर यांनी कसोटी क्रमवारीत नंबर वनची गदा प्रदान केली.
- तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला क्लीन स्वीप देणाऱ्या टीम इंडियाने आता कसोटी क्रमवारीतील आपले नंबर वनचे स्थान अधिक मजबूत केले.
- भारताने 3-0 ने मालिका जिंकली. आता भारताचे क्रमवारीत 115 गुण झाले आहेत.
- दुसऱ्या स्थानावर असलेल्या पाकच्या नावे 111 गुण आहेत. आता विंडीजविरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली तरीही पाकचे क्रमवारीत 112 गुण होतील. त्यामुळे भारताचे नंबर 1 आगामी काळात कायम राहील हे स्पष्ट आहे.
पुढे स्लाईडद्वारे फोटोजमधून पाहा, टीम इंडियाच्या खेळाडूंनी असा केला जल्लोष...
बातम्या आणखी आहेत...