श्रीलंकेविरोधात कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सध्या कुटूंबासोबत वेळ घालवत आहेत. दोन दिवसांपूर्वी अजिंक्य रहाणे याने घरचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. त्याने लिहीले की, नवीन घरात त्याला सरप्राइज मिळाले. त्याच्या घरात भिंतींवर त्याचा बॅटिंग करतानाचा फोटो आणि पत्नीसोबतचे स्केच लावलेले आहे. तसेच चेतेश्वर पुजारा, मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली यांनीही आपले काही फोटो शेयर केली आहेत.
एक महिना विश्रांती
यावेळी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना सुमारे एका महिन्याची विश्रांती मिळणार आहे. 1 सप्टेंबरला श्रीलंका दौरा संपल्यानंतर आता टीम इंडियाला पुढची मालिका दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळायची आहे. 2 ऑक्टोंबरला ही मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे या कालावधितील सुट्यांचा क्रिकेटर्स कुटूंबासोबत आनंद घेत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, क्रिकेटर्सनी सोशल मिडीयावर शेयर केलेले फोटो..