आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोव्हेंबरमध्ये भारतीय वंशाच्या ३ खेळाडूंनी केले पदार्पण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृत्तसंस्था | नवी दिल्ली - अातापर्यंत भारतीय वंशाचे अनेक खेळाडू विदेशी संघांकडून खेळले आहेत. मात्र, नोव्हेंबर महिन्यात एक अागळावेगळा विक्रम घडला. या एका महिन्यात भारतीय वंशाच्या तीन खेळाडूंनी विदेशी संघांकडून पदार्पण केले. तेसुद्धा कसोटीत. हा विक्रम असू शकतो. न्यूझीलंकडून जीत रावलने, द. आफ्रिकेकडून केशव महाराजने, तर इंग्लंडकडून हसीब हमीदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आजघडीला चार संघांकडून भारतीय वंशाचे सात खेळाडू खेळत आहेत. द. आफ्रिकेकडून हाशिम आमला, केशव महाराज, तबरेस शमसी,
तर न्यूझीलंकडून ईश सोढी आणि जीत रावल, वेस्ट इंडीजकडून देवेंद्र बिशू आणि इंग्लंडकडून हसीब हमीद खेळत आहेत. याशिवाय इंग्लंड संघात दोन असे खेळाडू आहेत, ज्यांचे पूर्वज पाकव्याप्त काश्मीरचे आहेत. हे दोघे म्हणजे आदिल रशीद आणि मोईन अली आहेत. वेस्ट इंडीजच्या वनडे संघात दिनेश रामदीन, रवी रामपॉल आणि नरसिंग देवनारायणसुद्धा भारतीय वंशाचे आहेत.
शाळेत पार्थिवचा ज्युनियर होता जीत

जीत रावलचा जन्म अहमदाबादेत झाला. तो शाळेत पार्थिव पटेलचा ज्युनियर होता. वयाची १६ वर्षे त्याने अहमदाबादेत काढली. जीत आणि पार्थिव शाळेच्या संघाकडून सलामीला खेळायचे. त्याने गुजरातच्या अंडर- १५, अंडर-१७ संघाकडूनही सहभाग घेतला. त्याने १७ नोव्हेंबर रोजी पाकविरुद्ध पदार्पण केले. तो रहाणे, चावलासोबतही खेळला आहे.
वडिलांचे राज्य गुजरातेत केले पदार्पण

इंग्लंडचा हसीब हमीदचे वडील गुजरातचे गाव उमराजचे आहेत. हमीदने ९ नोव्हेंबर रोजी भारताविरुद्ध पदार्पण केले. त्याचा पहिला सामना पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंब राजकोटला आले होते. त्याचे कुटुंब ६० च्या दशकात बॉल्टनला (इंग्लंड) िशफ्ट झाले.
नॉर्थ इंडियाचे आहेत केशवचे पूर्वज

केशव महाराजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत पदार्पण केले. संघात अष्टपैलूची भूमिका पार पाडणारा केशव महाराज नॉर्थ इंडियातून आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी तो द. आफ्रिकेत स्थायिक झाला. त्याचे वडील आत्मानंद महाराजसुद्धा क्रिकेटपटू होते. केशव तीन वर्षांचा होता तेव्हा भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनी तो क्रिकेटपटू होणार असल्याची भविष्यवाणी केली होती.
बातम्या आणखी आहेत...