आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Origin Cricketer\'s Head Cut By Fellow Cricketer In South Africa

भारतीय वंशाच्या क्रिकेटरचे आफ्रिकेत शिर कापले, सहकारी क्रिकेटरचे कृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहन्सबर्ग (दक्षिण आफ्रिका)- भारतीय वंशाच्या अपंग क्रिकेटरची शिर कापून हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बळी देण्यासाठी त्याची हत्या झाल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहकारी क्रिकेटरसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याजवळ मृताचा मोबाईल फोन आणि काही वस्तू सापडल्या आहेत.
यासाठी कापले शिर
पोलिसांनी सांगितले, की 23 वर्षिय या क्रिकेटरचे नाव नवाज खान असे आहे. त्याचा मित्र टी ड्यूमा काही तरी कारण सांगून जंगलात घेऊन गेला. त्यानंतर चाकूने त्याने नवाजचे शिर कापले. पोलिस चौकशीत ड्यूमाने सांगितले, की एका मांत्रिकाने मला मानवी शिर आणण्यास सांगितले होते. त्यानंतर माझ्या सर्व सामस्या सुटतील असेही त्याने म्हटले होते. ड्यूमावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. त्याला घटनास्थळीही नेण्यात आले होते.
2013 मध्ये हाशिम आमलाने केला होता गौरव
नवाजची आई जाकिया खान यांनी सांगितले, की माझ्या मुलाला 2013 मध्ये इंटेलॅक्चूअल इंपेयर्ड अवॉर्डने गौरविण्यात आले होते. हाशिम आमलाने हा पुरस्कार त्याला दिला होता. त्याच्यात खुप कौशल्य होते. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे होते.