कोलकाता- आयपीएल-१० मधील ५४ व्या सामन्यात मुंबईने कोलकात्यावर ९ धावांनी मात केली. ईडन गार्डनवर प्रथम फलंदाजी करतांना मुंबईने निर्धारीत २० षटकात ५ बाद १७३ धावा बनवून कोलकात्यासमोर विजयासाठी १७४ धावांचे आव्हान ठेवले होते. पाठलाग करतांना कोलकाता नाईट रायडर्स संघ २० षटकात ८ बाद १६४ धावां पर्यंतच मजल मारू शकला. मुंबई इंडियन्सकडून मनोज तिवारीने ५२ तर अंबाती रायडूने सर्वाधिक ६३ धावा बनवून अर्धशतके झळकवली.
टीम साऊथी (२/३९), विनय (२/३१) अाणि हार्दिकने (२/२२) शानदार गाेलंदाजी करताना दाेन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला अायपीएल-१० मध्ये धडाकेबाज विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईने शनिवारी गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवले. मुंबईचा लीगमधील हा दहावा विजय ठरला. काेलकात्याला सहाव्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले.
साैरभ तिवारी (५२) अाणि अंबाती रायडू (६३) यांच्या झंझावाताच्या बळावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना काेलकात्यासमाेर विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात काेलकात्याला ८ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारता अाली. काेलकात्याकडून मनीष पांडेने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. गाैतम गंभीरसह (२१), लीन (२६), सुनील नरेन (०), उथप्पा (२) यांना समाधानकारक खेळी करता अाली नाही.
मुंबई संघात तब्बल सहा बदल...
या सामन्यासाठी मुंबई संघात तब्बल सहा बदल करण्यात आले होते. सौरव तिवारी, रायडू, टीम साऊथी, मिशेल जॉन्शन, विनयकुमार, क्रृणाल पांड्या यांना संधी देताना पार्थिव पटेल, जसप्रित बुमराह, लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लेघन, नितीश राणा आणि हरभजन सिंग यांना विश्रांती देण्यात आली.