श्रीलंकेत होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली संघाचे नेतृत्व करणार असून हरभजनबरोबरच फिरकिपटूंमध्ये अमित मिश्राचे पुनरागमन झाले आहे. तसेच वेगवान गोलंदाजांमध्ये इशांत शर्मा आणि वरुन अॅरॉन यांचा समावेश करण्यात आला आहे. दौऱ्यात पहिली कसोटी 12 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
संघाची निवड करताना केवळ फॉर्म लक्षात न घेता फिटनेसही लक्षात घेण्यात येत आहे असे मत निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांचीही उपस्थिती होती.
विराटची छाप
ज्यावेळी कर्णधार बदलला जातो त्यावेळी त्याच्या विचारानुसार संघावरही त्याची छाप दिसणारच असे सांगत निवड समितीने विराटचे मतही टीम निवडताना ऐकले जात असल्याचे एका प्रकारे मान्यच केले आहे. धोनीच्या संघात वारंवार दिसणारे रैना, जडेजा यांच्या निवडीच्या मुद्यावरून याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
दौऱ्यासाठी संघ खालीलप्रमाणे
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहाणे, लोकेश राहुल, मुरली विजय, वृद्धीमान साहा, हरभजन सिंग, अमित मिश्रा, आर अश्विन, इशांत शर्मा, वरुण अॅरॉन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव
दौऱ्याचे वेळापत्रक
सराव सामना : 6-8 ऑगस्ट (तीन दिवसीय)
पहली टेस्ट : 12-16 ऑगस्ट
दुसरी टेस्ट : 20-24 ऑगस्ट
तिसरा टेस्ट : 28 ऑगस्ट-एक सप्टेंबर