Home »Sports »From The Field» Indian Team Announced For 4th And 5th Match Against Australia

शिखर धवनचे पुनरागमन हुकले; अक्षर पटेलला संधी, जडेजा बाहेर, बंगळुरूत गुरुवारी चाैथा वनडे

हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल या युवा खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने घरच्या मैदानावर

वृत्तसंस्था | Sep 26, 2017, 05:18 AM IST

  • शिखर धवनचे पुनरागमन हुकले; अक्षर पटेलला संधी, जडेजा बाहेर, बंगळुरूत गुरुवारी चाैथा वनडे
नवी दिल्ली - हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल या युवा खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने घरच्या मैदानावर अाॅस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका अापल्या नावे केली. अाता मालिकेतील उर्वरित दाेन सामन्यांसाठी बीसीसीअायच्या निवड समितीने भारतीय संघात एका युवा खेळाडूचा समावेश केला.
उर्वरित चाैथ्या व पाचव्या वनडेसाठी युवा फिरकीपटू अक्षर पटेलची संघात निवड झाली. रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात अाली. निवड समितीने साेमवारी भारतीय संघाची घाेषणा केली. पत्नीच्या अस्वस्थ प्रकृतीमुळे पहिल्या तीन वनडेतून बाहेर पडलेल्या सलामीवीर शिखर धवनला उर्वरित दाेन सामन्यांसाठी संघात पुनरागमन करता अाले नाही. भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी अाघाडी घेतली अाहे. येत्या गुरुवारी मालिकेतील चाैथा वनडे सामना बंगळुरूच्या मैदानावर हाेईल. त्यानंतर १ अाॅक्टाेबर राेजी नागपूरच्या मैदानावर पाचव्या व शेवटच्या वनडेत भारत व अाॅस्ट्रेलिया समाेरासमाेर असतील.

फिट अक्षर पटेलला संधी
गंभीर दुखापतीमुळे युवा फिरकीपटू अक्षर पटेलला पहिल्या तीन वनडे सामन्यांतून बाहेर करण्यात अाले. अाता पूर्णपर्ण फिट असलेल्या या युवा खेळाडूला दमदार पुनरागमन करण्याची संधी अाहे. त्याला जडेजाच्या जागी संघात स्थान मिळाले.

रहाणेची संधी कायम
पुनरागमनचा धवनचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे अजिंक्य रहाणेची सलामीला फलंदाजी करण्याची संधी कायम राहिली अाहे. त्याला अागामी सामन्यातही सलामीची संधी अाहे.
चाैथ्या वनडेवर पावसाचे सावट : बंगळुरूमध्ये हाेणाऱ्या चाैथ्या वनडे सामन्यावरही पावसाचे सावट अाहे. गुरुवारी हा सामना हाेणार अाहे.

काेहली अव्वलस्थानी; बुमराह चाैथ्या स्थानी:मालिका विजयात माेलाचे याेगदान देणारा काेहलीने वनडे क्रमवारीतील अापले अव्वल स्थान कायम ठेवले. दुसरीकडे युवा जसप्रीत बुमराहने गाेलंदाजीमध्ये चाैथ्या स्थानावर धडक मारली अाहे.
भारतीय संघ
विराट काेहली (कर्णधार), राेहित शर्मा (उपकर्णधार), लाेकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धाेनी, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, माे. शमी, अक्षर पटेल.
कांगारूंना धक्का ; एगर मालिकेतून बाहेर
मालिका पराभवाने अडचणीत सापडलेला अाॅस्ट्रेलिया संघाला अाता अागामी सामन्यापूर्वीच माेठा धक्का बसला.दुखापतीमुळे फिरकीपटू एगर मालिकेतून बाहेर पडला. त्याने टीम अडचणीत अाली अाहे.

Next Article

Recommended