आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्ट इंडीज टूरसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्मा संघाबाहेर... या दोन नव्या खेळाडूंची एंट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर होणाऱ्या वेस्ट इंडीज टूरसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने गुरुवारी 15 सदस्यांच्या संघाची घोषणा केली. यात 2 खेळाडूंना संघातून वगळण्यात आले, तर 2 नव्या खेळाडूंचा प्रवेश झाला आहे. आयपीएलच्या 10व्या सीझनमध्ये शानदार परफॉर्मन्स देणाऱ्या ऋषभ पंतला संघात सामील करण्यात आले आहे. पंतने आयपीएलमध्ये 14 सामन्यांत 366 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीज टूर 23 जूनपासून सुरू होणार आहे. तेथे टीम इंडिया 5 वनडे आणि एक टी 20 सामना खेळणार आहे. 
 
रोहित आणि बुमराहला वगळले...
- टीममधून बाहेर होणाऱ्या खेळाडूंत सर्वात मोठे नाव रोहित शर्माचे आहे. शिवाय जसप्रीत बुमराहलाही वेस्ट इंडीज जाणाऱ्या संघात स्थान नाही मिळाले.
- ज्या दोन खेळाडूंना प्रवेश देण्यात आला आहे त्यात ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. 
 
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी असा राहील संघ...
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, युवराज सिंह, केदार जाधव, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक.
 
वेस्ट इंडीज दौऱ्याचे वेळापत्रक
 
दिनांक
वार
सामना
स्थळ
23 जून
शुक्रवार
1st ODI
क्वीन्स पार्क, ओव्हल.
25 जून
रविवार
2nd ODI
क्वीन्स पार्क, ओव्हल.
30 जून
शुक्रवार
3rd ODI
एसव्हीआरएस
2 जुलै
रविवार
4th ODI
एसव्हीआरएस
6 जुलै
गुरुवार
5th ODI
सबिना पार्क
9 जुलै
रविवार
1st T20I
सबिना पार्क
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा विंडीज दौऱ्यात सामील टीम इंडियाचे दोन नवे खेळाडू...