आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंकित-नाैशाद, अश्विन, वाॅर्नरने खेचली विजयश्री; भारताने मोडला 32 विजयांचा अापला विक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- काेहलीच्या द्विशतकापाठाेपाठ  अश्विनने (४/६३) बळींचा चाैकार मारून यजमान टीम इंडियाला साेमवारी श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीत शानदार विजय मिळवून दिला. भारताने अापल्या घरच्या मैदानावर एक डाव अाणि २३९ धावांनी एकतर्फी विजय अापल्या नावे केला. यासह  भारताने अापल्याच कसाेटी क्रिकेटमधील सर्वात माेठ्या विजयाची बराेबरी साधली. भारताने यापूर्वी २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध असाच  विजय मिळवला हाेता. तसेच हा भारताचा ३२ वा विजय ठरला. अाता भारताला सत्रात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम करण्याची माेठी संधी अाहे.   


भारताने तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील तिसऱ्या अाणि निर्णायक कसाेटीला २ डिसेंबरपासून दिल्लीच्या मैदानावर सुरुवात हाेईल. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिली कसाेटी ड्राॅ झाली हाेती. पहिल्या डावात ४०५ धावा काढणाऱ्या श्रीलंकेने दुसरा डाव अवघ्या १६६ धावांत गुंडाळला. यासह भारताने अापला विजय निश्चित केला. भारताने अापला पहिला डाव ६१० धावांवर घाेेषित केला हाेता.   


अश्विनचा विश्वविक्रम 
भारताच्या फिरकीपटू अार.अश्विनने दुसऱ्या डावात बळींचा चाैकार मारला. यासह त्याने कसाेटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ३०० विकेट पूर्ण केल्या. यासह त्याने सर्वात वेगवान कसाेटी विकेट घेण्याचा विश्वविक्रम केला.  ३०० विकेट घेणारा अार. अश्विन हा भारताचा पाचवा गाेलंदाज ठरला. यादरम्यान त्याने अाॅस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध वेगवान गाेलंदाज डेनिस लिलीचा वेगवान ३०० विकेटचा विक्रम माेडीत काढला.    

 

भारताने केला ३२ विजयांचा अापला विक्रम; अाता वर्ल्ड रेकाॅर्डची संधी

> २०१७ मध्ये ४६  सामन्यात भारताचे ३२ विजय, अाॅस्ट्रेलियाचे २००३ मध्ये ३८ विजय

- दुसऱ्या कसोटीत डाव अाणि २३९ धावांनी मात करून भारताने अापल्याच माेठ्या विजयाशी साधली बराेबरी  
- श्रीलंकेच्या पराभवाचे शतक, कसोटीत अातापर्यंतचा ठरला सर्वात माेठा पराभव  
- अश्विनचा सर्वात वेगवान ३०० विकेटचा विश्वविक्रम.

 

तिन्ही फाॅरमॅटमध्ये ३२ विजय   
भारताने यंदाच्या सत्र २०१७ मध्ये  अांतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅट मिळून (वनडे, कसाेटी अाणि टी-२०) ३२ वा विजय संपादन केला. ही भारताची सत्रातील सर्वाधिक विजयाची माेठी संख्या ठरली. भारताने २०१६ च्या सत्रामध्ये ३१ विजय संपादन केले हाेते. अाता या कामगिरीला भारताने मागे टाकले.  सत्रात सर्वाधिक  विजयाचा विक्रम अाॅस्ट्रेलियाच्या नावे अाहे. या टीमने २००३ मध्ये ३८ विजय मिळवले हाेते.

 

श्रीलंकेच्या पराभवाचे शतक 

सातत्याने सुमार खेळीमुळे श्रीलंका टीम सत्रामध्ये सपशेल अपयशी ठरत अाहे. यातूनच अाता श्रीलंकेला पराभवाच्या शतकाला गवसणी घालता अाली. श्रीलंकेचा कसाेटीत १०० वा पराभव ठरला. तसेच सत्रातील सातवी कसाेटी गमावली.

 

नागपुरात यंदा विजयाची हॅट््ट्रिक 
भारताने अापल्या घरच्या मैदान नागपुरात विजयाची हॅट््ट्रिक नाेंदवली. भारताने या ठिकाणी झालेल्या तिन्ही फाॅरमॅटच्या सामन्यात विजयी पताका फडकावली. भारताने या ठिकाणी श्रीलंकेविरुद्ध कसाेटी, इंग्लंडविरुद्ध टी-२० अाणि अाॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामना जिंकला. 

 

श्रीलंकेचा भारतात ११ वा पराभव 
श्रीलंकेचा भारत दाैऱ्यावर विजयाचे खाते उघडण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. यातून श्रीलंकेला भारतातील मैदानावर ११ व्या कसाेटीत पराभवाला सामाेरे जावे लागले. अद्याप एकही विजय श्रीलंकेला दाैऱ्यात मिळवता अाला नाही. 

 

पुढील स्‍लाइडवर.. अंकितच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विजय...

बातम्या आणखी आहेत...