आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला टीमला वर्ल्डकपचे तिकीट; विश्वचषक पात्रता फेरीत बांगलादेशवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलंबाे - सलगच्या विजयाने अात्मविश्वास बुलंदीवर असलेल्या भारतीय महिला संघाने शुक्रवारी अायसीसीच्या विश्वचषकातील अापला प्रवेश निश्चित  केला. २०१७ चा वर्ल्डकप   २४ जून ते २३ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये हाेणार अाहे. भारताने पात्रता फेरीत  बांगलादेशवर ९ गड्यांनी मात केली. मिताली राजने षटकार ठाेकून भारताचा विजय निश्चित केला.   

माेना मेश्राम (नाबाद ७८) अाणि कर्णधार मिताली राज (नाबाद ७३) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारताने ३३.३ षटकांमध्ये सामना जिंकला. या विजयाच्या बळावर भारताला स्पर्धेतील अापला दबदबा कायम ठेवता अाला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ८ बाद १५५ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरामध्ये भारताने एका गड्याच्या माेबदल्यामध्ये झटपट लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर दीप्ती शर्मा (१) स्वस्तात बाद झाली. त्यानंतर अालेल्या कर्णधार मितालीने नाबाद खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. तिने सलामीवीर माेना मेश्रामसाेबत दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य १३६ धावांची भागीदारी करून भारताचा विजय निश्चित केला.   

मिताली-माेनाची फटकेबाजी : भारताकडून माेना मेश्राम अाणि मिताली राजने तुफानी फटकेबाजी केली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य भागीदारी केली. मितालीने ४३ वे अर्धशतक ठाेकले. तिने ८७ चेंडूंत १० चाैकार अाणि एका षटकारासह ७३ धावा काढल्या. माेनाने ९२ चेंडूंत नाबाद ७८ धावांची खेळी केली. 

मानसीचे तीन बळी:  मानसी जाेशीने धारदार गाेलंदाजी करताना ३ बळी घेतले. देविका वैद्यने २ विकेट घेतल्या. शिखा पांडे व राजेश्वरी गायकवाडने प्रत्येकी एक गडी बाद केला.
 
उद्या भारत-पाक लढत 
अाता रविवारी भारत अाणि कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान समाेरासमाेर असतील. या दाेन्ही संघांमध्ये सामना रंगणार अाहे. पाकला धूळ चारून अापला दबदबा कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
 
भारतीय महिला अव्वलस्थानी
सलगच्या विजयामुळे भारताला अापली लय कायम ठेवता अाली. याशिवाय भारतीय महिलांनी गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. भारताच्या नावे एकूण ६ गुण अाहेत. बांगलादेशची टीम दाेन गुणांसह पाचव्या स्थानावर अाहे.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...