आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय महिलांकडून पाकचा धुव्वा, ५ गड्यांनी मात; हरमनप्रीत सामनावीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकाॅक - हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने अाशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी विजयाची हॅट्ट्रिक केली. भारताने अापल्या तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. स्पर्धेत भारताने ५ गड्यांनी पाकवर मात केली. भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. अाॅलराउंडर हरमनप्रीत काैर सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
प्रथम फलंदाजी करताना पाकने ७ बाद ९७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात भारताने १९.२ षटकांत ५ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. हरमनप्रीत (नाबाद २६), मिताली राज (३६) व स्मृती मंधनाने (१४) संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले.

धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला सलामीवीर मिताली राज अाणि स्मृती मंधनाने चांगली सुरुवात करून दिली. स्मृतीला (१४) सादियाने बाद केले. त्यापाठाेपाठ मेघना (८) व वेदा (२) बाद झाल्या. मात्र, मितालीने ५७ चेंडूंत ३ चाैकारांसह ३६ धावा काढल्या. त्यानंतर हरमनप्रीतने नाबाद २६ धावांची खेळी करत विजय निश्चित केला. सादिया युुसूफ व निदा दारने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या.

एकता, हरमनप्रीतची भेदक गाेलंदाजी : भारताकडून एकता बिस्ट (३/०), हरमनप्रीत काैर (२/१६) अाणि अनुजा पाटीलने (२/१२) भेदक गाेलंदाजी केली. त्यामुळेे पाकच्या महिला संघाला ९७ धावांची खेळी करता अाली. पाककडून निदाने सर्वाधिक ३७ धावा काढल्या. अायेशाने २८ व इरामने १० धावा काढल्या.
बातम्या आणखी आहेत...