आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला टीमची न्यूझीलंडवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कर्णधारपदाला साजेशी खेळी करून मिताली राजने (नाबाद ८१) भारतीय महिला टीमला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून दिला. यजमान भारताने साेमवारी चाैथ्या वनडेत पाहुण्या न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला. यासह यजमान संघाने पाच वनडेच्या मालिकेत २-२ ने बराेबरी साधली. अाता मालिकेतील पाचवा अाणि निर्णायक सामना बुधवारी हाेणार अाहे.

मिताली व स्मृतीने शतकी भागीदारीच्या बळावर ४४.२ षटकांत भारताचा विजय खेचून अाणला. न्यूझीलंडने यजमानांसमाेर २२१ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. भारतीय महिला टीमने दाेन गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. भारताच्या विजयात कामिनीने ३१ धावांचे माेलाचे याेगदान दिले.

स्मृती-मितालीचा शतकी धमाका
धावांचा पाठलाग करणा-या भारतीय संघाला सलामीवीर कामिनी अाणि स्मृतीने दमदार सुरुवात करून दिली. या जाेडीने टीमला ४९ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. त्यानंतर मितालीने धमाका उडवला. तिने स्मृतीसाेबत दुस-या गड्यासाठी १२४ धावांची भागीदारी केली. यात स्मृतीने ९९ चेंडूंचा सामना करताना अाठ चाैकारांसह ६६ धावा काढल्या. तसेच मितालीने ८८ चेंडूंत नाबाद ८१ धावांची खेळी केली. यात १० चाैकारांचा समावेश अाहे. स्मृती बाद झाल्यानंतर मितालीला हरमितने (नाबाद ३१) माेलाची साथ दिली.

निरंजना, राजेश्वरीची धारदार गाेलंदाजी
भारतीय संघाकडून निरंजना अाणि राजेश्वरी गायकवाडने धारदार गाेलंदाजी केली. या दाेघींनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तसेच माजी कर्णधार झुलन गाेस्वामी अाणि पुनम यादवने प्रत्येकी एक बळी घेतला. हरमित काैरने दाेन गडी बाद केले.
छायाचित्र: मिताली राजच्या अर्धशतकाने विजय साकारला.