आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Women Team Defeated Sri Lanka By 7 Wickets

भारतीय महिला विजयी; लंकेवर ७ गड्यांनी मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - फाॅर्मात असलेल्या भारतीय महिला संघाने धडाकेबाज विजयासह श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका ३-० ने जिंकली. यजमान भारतीय महिला टीमने शेवटच्या वनडेत श्रीलंकेचा धुव्वा उडवला. भारताने ७ गडी अाणि १२३ चेंडू राखून सामन्यात विजयाची नाेंद केली. यासह श्रीलंकेच्या टीमला सलग तिसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले. या टीमला मालिकेत एकाही विजयाची नाेंद करता अाली नाही.

सामनावीर दीप्ती शर्माची (६/२०) धारदार गाेलंदाजी अाणि वेदा कृष्णमूर्तीच्या (६१) नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने तिसरा सामना जिंकला.प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका टीमने ३८.२ षटकांत ११२ धावांची खेळी केली. त्यानंतर भारताने २९.३ षटकांत तीन गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले.