आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्‍यूझिलँडकडून भारतीय महिला संघाचा पहिल्‍या T 20 मध्‍ये पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताची विकेट मिळाल्‍यानंतर जल्‍लोष करताना न्‍यूझिलँडचा संघ. - Divya Marathi
भारताची विकेट मिळाल्‍यानंतर जल्‍लोष करताना न्‍यूझिलँडचा संघ.
न्‍यूझिलँडने भारतीय महिला क्रिकेट संघाला पहिल्‍याच टी 20 सामन्‍यात आज (शनिवार)
पराभूत केले. न्‍यूझिलँडने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय संघ 19.5 ओव्‍हरमध्‍ये 125 धावा बनवू शकला. न्‍यूझिलँडने दोन गडी गमावून 12.3 ओव्‍हरमध्‍ये हे ध्‍येय गाठत विजयावर नाव कोरले.
भारतासाठी कर्णधार मिताल राजने 23 चेंडूत 35 धावा काढल्‍या. अन्‍य फलंदाज गोलंदाजांसमोर फारसे टिकू शकले नाहीत. तेज गोलंदाज मार्ना नीलसन आणि क्रेट ब्राडमोरने एकूण सहा विकेट घेतल्‍या. ऑफ स्‍पिनर ली कास्‍पेरेकला दोन गडी बाद करता आले. भारताने सात विकेट या 13 व्‍या ओव्‍हरमध्‍ये गमावल्‍या. तेव्‍हा संघाच्‍या धावा 85 होत्‍या.
सोफी डेवाइनच्‍या 22 चेंडूत 70 धावा
न्‍यूझिलँडसाठी कर्णधार सोफी डेवाइन ने 22 चेंडूत 70 धावा जमवल्‍या. ज्‍यामध्‍ये पाच चौकार
आणि आठ छटकार होते. एमी सेटर्थवेटनेही 35 चेंडूत 39 धावा काढल्‍या.