आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Womens Cricket Team Lost Match Against New Zealand

भारताविरुद्ध न्यूझीलंड महिलांचा विजय, मालिकेत २-१ ने अाघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळूरू - सुुझी बेट्सच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या महिला संघाने शुक्रवारी यजमान भारतीय संघाचा पराभव केला. जबरदस्त फाॅर्मात असलेल्या पाहुण्या न्यूझीलंंड संघाने सहा गड्यांनी विजय संपादन केला. यासह या टीमने मालिकेत सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. याशिवाय न्यूझीलंडच्या महिला टीमने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत २-१ ने अाघाडी घेतली.

सुझी बेट्स (५९) अाणि प्रिइस्ट (६४) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळवर न्यूझीलंडने ४५.४ षटकांत सामन जिंकला. प्रथम फलंदाजी करताना यजमान टीमने निर्धारित ५० षटकांत ९ बाद १८२ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या महिला संघाने ४ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. अावाक्यातल्या अाव्हानाचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड टीमने दमदार सुरुवात केली. त्यामुळे टीमला विजय शक्य झाला. तसेच संघाच्या विजयात साट्टेरव्हाइट (नाबाद २२), ग्रीन (१४), डेव्हीने (१७) यांनीही माेलाचे याेगदान दिले.

भारतीय महिला संघाकडून गाेलंदाजीत गाेस्वामी, एकता बिस्ट, दीप्ती शर्मा अाणि हरमित काैरने प्रत्येकी एक बळी घेतला. मात्र, त्यांना यजमान टीमचा पराभव टाळता अाला नाही. एकताला समाधानकारक अशी खेळी करता अाली नाही.

सुझी-प्रिइस्टची शतकी भागीदारी
न्यूझीलंडकडून कर्णधार सुझी बेट्स व प्रिइस्टने शतकी भागीदारी केली. या दाेघांनी पहिल्या गड्यासाठी १२५ धावांच्या भागीदारीची खेळी केली. याशिवाय त्यांनी वैयक्तिक अर्धशतकही अापल्या नावे केले. सुझीने ८७ चेंडूंचा सामना करताना सात चाैकारांसह ५९ धावा काढल्या. तसेच प्रिइस्टने १०१ चेंडूंत ६४ धावांची खेळी केली.

कृष्णमूर्तीचे अर्धशतक व्यर्थ
भारताची निराशाजनक सुरुवात झाली. स्मृती (८), कामिनी (४) स्वस्तात बाद झाल्या. कर्णधार मिताली राजने ३० धावा काढल्या. हरमितने ११ धावाचे याेगदान दिले. अखेर वेदा कृष्णमूर्तीने डाव सावरला. तिला दीप्ती शर्माची महत्त्वाची साथ मिळाली. वेदाने ८५ चेंडंूत ६१ धावा काढल्या. तसेच दीप्तीने २२ धावांची खेळी केली.