आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अायसीसी महिला वनडे क्रमवारी: भारतीय महिला टीमची क्रमवारीत चाैथ्या स्थानी धडक!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- विश्वचषक स्पर्धेतील उपविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने अायसीसीच्या क्रमवारीत माेठी प्रगती साधली. भारताच्या महिलांनी क्रमवारीत चाैथे स्थान गाठले. भारतीय संघाच्या नावे अाता एकूण ११६ रेटिंग गुण झाले अाहेत. वर्ल्डकपमधील सर्वाेत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारताने क्रमवारीत सुधारणा केली. भारताच्या महिलांनी या वर्ल्डकपच्या फायनलपर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठला हाेता. दरम्यान, यातील पराभवाने भारतीय महिलांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, यासाठी दिलेली झंुज महत्त्वपूर्ण ठरली. 
 
अाता अागामी दाैऱ्यात उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर क्रमवारीत माेठी सुधारणा करण्याचा कर्णधार मिताली राजचा मानस अाहे. यातून भारताच्या महिलांना दाेन गुणांच्या बळावर तिसरे स्थान सहज गाठता येईल. ११८ गुणांसह न्यूझीलंड टीम तिसऱ्या स्थानावर कायम अाहे. दुसरीकडे क्रमवारीत विंडीजची महिला टीम पाचव्या स्थानावर अाहे. 

दक्षिण अाफ्रिकेने सहावे अाणि पाकिस्तानने सातवे स्थान गाठले. त्यापाठाेपाठ श्रीलंकन महिला टीम अाठव्या स्थानावर अाहे. विंडीज अाणि अाफ्रिकन महिला टीममध्ये अाता पाचव्या स्थानासाठी झंुज रंगण्याची शक्यता अाहे. विंडीजवर कुरघाेडी करून प्रगती साधण्याचा अाफ्रिकन महिलांचा प्रयत्न असेेल. 

अायसीसीचे पाठबळ
महिलांच्या क्रिकेटला चालना मिळावी अाणि माेठ्या संख्येत महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे अायाेजन करण्यात यावे, यासाठी अायसीसी प्रयत्नशील अाहे. त्यामुळे अायसीसी लवकरच महिलांच्या स्पर्धेच्या अायाेजनाची घाेषणा करण्याची शक्यता अाहे. यात वनडे व टी-२०च्या फाॅरमॅटचा समावेश असेल.

अागामी सत्रात सर्वाधिक मालिका
 अागामी नव्या सत्रामध्ये महिलांच्या सर्वाधिक क्रिकेट मालिकांचे अायाेजन करण्यात येणार अाहे. यामध्ये कसाेटीसह वनडे अाणि टी-२० च्या फाॅरमॅटचा समावेश अाहे. या तिन्हीच्या सामन्यांचे अायाेजन करून महिलांच्या प्रतिभेला चालना देण्यात येईल. यासाठी लवकरच अापली अागामी सत्राची याेजना जाहीर करणार अाहे, अशी माहिती जनरल मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांनी दिली. या याेजनेमध्ये सत्रातील मालिकाच्या अायाेजनांसह विदेश दाैऱ्यांचा समावेश अाहे.  

अाॅस्ट्रेलियावर कुरघाेडी; इंग्लंड अव्वल 
 वर्ल्डकप विजेत्या इंग्लंडने अाता अाॅस्ट्रेलियन टीमवर कुरघाेडी केली अाणि क्रमवारीत नंबर वनचे सिंहासन गाठले. यामुळे अाॅस्ट्रेलियन महिला टीमची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली.  या दाेन्ही संघांचे रेटिंग गुण प्रत्येकी १२८ अाहेत. मात्र, दशांशाच्या अाधारे इंग्लंडने बाजी मारली अाणि अव्वल स्थान गाठले.  
बातम्या आणखी आहेत...