आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय महिलांचा शानदार विजय, मालिकेत १-० ने अाघाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - स्नेहा राणा (३/२६), एकता बिस्ट (२/१८), हरमित कौरच्या (२/१६) भेदक गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने न्यूझीलंडवर १७ धावांनी मात केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्वबाद १४२ धावा उभरल्या. हे माफक अाव्हान न्यूझीलंड सहज पार करेल असे वाटत असताना भारतीय गोलंदाजांनी शानदार मारा करत न्यूझीलंडला अवघ्या १२५ धावांवर रोखले.

भारताचा डाव ४४.३ षटकांत १४२ धावांवर संपुष्टात आला. यात सातव्या क्रमांकावर आलेल्या झुलन गोस्वामीने शानदार अर्धशतकी खेळी केली. तिने ६७ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार आणि १ षटकार खेचत ५७ धावा ठोकल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. स्मृती मानधना (१३), पी. राऊत (५), कर्णधार मिताली (१७), एस. पांडे (५), हरमित कौर (७), कृष्णमूर्ती (१), स्नेहा राणा (७), एकता (१२), कल्पना (३) आणि आर. एस. गायकवाड (३ नाबाद) मोठी खेळी करू शकली नाही. न्यूझीलंडकडून ताहुहू, निल्सन व कॅपेरेकने प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा डाव अवघ्या १२५ धावांत आटोपला.

झुलनची अर्धशतक खेळी
भारतीय महिला संघाकडून माजी कर्णधार झुलन गाेस्वामीने शानदार अर्धशतकी खेळी केली. तिने ६७ चेंडूंचा सामना करताना संघाकडून सर्वाधिक ५७ धावा काढल्या. यामध्ये सहा चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. तसेच कर्णधार मितालीने १७ धावांचे या वेळी याेगदान दिले.

संक्षिप्त धावफलक : भारत : १४२ धावा.(झुलन ५७, मिताली १७, ३/२४ निल्सन). न्यूझीलंड : १२५ धावा. (एस. बटेस २८, डेव्हिन २४ धावा. एस. राणा २६/३).
बातम्या आणखी आहेत...