आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय युवा टीमचा मालिका विजय, 19 वर्षांखालील वनडे मालिका, इंग्लंडचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फाॅर्मात असलेल्या भारतीय युवा संघाने साेमवारी  चाैथ्या वनडेत इंग्लंडचा वर २३० धावांनी मात केली. या विजयामुळे भारताला इंग्लंडविरुद्ध पाच वनडे सामन्यांची मालिका ३-१ ने अापल्या नावे करता अाली.  अाता  शेवटचा व पाचवा वनडे बुधवारी हाेणार अाहे.
 
शुभम गिल (१६०) अाणि पृथ्वी (१०५) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३८२ धावांचा डाेंगर रचला हाेता. इंग्लंडचा   ३७.४ षटकांत १५२ धावांमध्ये खुर्दा उडाला.   इंग्लंडचे   ब्रुक (०), बॅनटाेन (६), बारटलेट्ट (०) व रावलिन्स (९) झटपट बाद झाले.  पाेपेने  ५९ धावांची खेळी केली.    

नागरकाेटीचा चाैकार : भारताकडून  कमलेश नागरकाेटीने बळींचा चाैकार मारला. त्याने अाठ षटकांमध्ये ३१ धावा देताना चार बळी घेतले. तिवारीने ३ व शिमव मवीने २ गडी बाद केले.   
पृथ्वी-शुभमची भागीदारी : भारताच्या शुभमने शानदार १६० धावा काढल्या. याशिवाय त्याने हिमांशु राणासाेबत ८३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर त्याने पृथ्वीसाेबत दुसऱ्या गड्यासाठी २३१ धावांची माेठी भागीदारी केली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...