आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indians Vs. Kings XI Punjab, IPL Match 51 At Mumbai: Live Scores And Updates

रोमांचक सामन्यात पंजाबची मुंबईवर 7 धावांनी मात; प्लेऑफचे आव्हान कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलामीवीर वृद्धीमान साहाने ५५ चेंडूत ११ चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीने नाबाद ९३ धावा केल्या. - Divya Marathi
सलामीवीर वृद्धीमान साहाने ५५ चेंडूत ११ चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीने नाबाद ९३ धावा केल्या.
मुंबई- अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सला ७ धावांनी पराभूत करून प्लेऑफचे आव्हान कायम ठेवले. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २३० धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबईने २० षटकांत ६ बाद २२३ धावा काढून झंुज दिली. मुंबईला अखेरच्या षटकांत विजयासाठी ६ चेंडूंत १६ धावांची गरज होती. या षटकात मोहित शर्माने १,६,०,०,०,१ अशा एकूण ८ धावा देऊन पंजाबचा विजय निश्चित केला. या सामन्यानंतर १४ गुण झाले आहेत. सामन्यात दोन्ही संघांकडून एकूण ४५३ धावांचा पाऊस पडला. यात ३६ चौकार आणि २६ षटकार बरसले. 

धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून सलामीवीर सिमन्सने ३२ चेंडूंत ५९ धावा, पार्थिवने २३  चेंडूंत ३८ धावा आणि पोलार्डने २४ चंेडूंत नाबाद ५० धावा काढल्या. इतरांनी निराशा केली. 

पंजाबचा २३० धावांचा डोंगर 
तत्पूर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाबने वृद्धिमान साहाच्या (नाबाद ९३) तुफानी फलंदाजीच्या बळावर २० षटकांत ३ बाद २३० धावांचा डोंगर उभा केला. पंजाबने पहिल्या चेंडूपासून मुंबईच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. गुप्तिल आणि साहा यांनी पंजाबला ५ षटकांत ६० धावांची सलामी मिळवून दिली. पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकांत मोठा फटका मारण्याच्या नादात गुप्तिल ३६ धावा काढून बाद झाला. त्याने १८ चेंडूंत १ षटकार, ५ चौकारांसह या धावा काढल्या. यानंतरही पंजाबची धावगती थांबली नाही. मैदानावर आलेल्या मॅक्सवेलने तुफानी खेळी करताना २१ चेंडूंंत ५ षटकार, २ चौकारांसह ४७ धावा ठोकल्या. शॉन मार्शने २५ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून मॅक्लानघन, बुमराह, कर्ण शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.

साहाची दमदार खेळी : एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुसऱ्या टोकाने वृद्धिमान साहाने नाबाद ९३ धावा ठोकल्या. साहाने ५५ चंेडूंत ३ षटकार आणि ११ चौकार मारले. त्याने गुप्तिलसोबत ५८, मॅक्सवेलसोबत ६३ धावांची भागीदारी केली. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मुंबई-पंजाब सामन्यातील क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...