आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहलीच्या द्विशतकी सामन्यात भारताला नंबर वन हाेण्याची संधी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कर्णधार विराट काेहलीच्या द्विशतकी सामन्यात यजमान टीम इंडियाला वनडे क्रमवारीत नंबर वन हाेण्याची संधी अाहे. काेहली रविवारी करिअरमधील २०० वा वनडे सामना खेळणार अाहे. या सामन्यातील विजयाने भारतीय संघ   नंबर वनचे सिंहासन गाठू शकेल. 

सलगच्या मालिका विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ  अाता न्यूझीलंडविरुद्धची अापली माेहीम फत्ते करण्यासाठी सज्ज अाहे. भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात हाेणार अाहे. सलामीचा वनडे सामना मंुबईच्या मैदानावर हाेईल. या सामन्यात बाजी मारून न्यूझीलंडविरुद्ध मालिका विजयाच्या माेहिमेला सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा मानस अाहे.  तिन्ही सामन्यात बाजी मारल्यास भारतीय संघाला तब्बल ४३ वर्षांनंतर सलग  सात वनडे मालिका  नावे करण्याची विक्रमी कामगिरी अापल्या नावे करता येईल. यासाठी भारताचे युवा खेळाडू उत्सुक अाहेत.

वानखेडेवर यजमानांचे वर्चस्व
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यजमान भारताचे वर्चस्व राहिलेले अाहे. भारताने अातापर्यंत या मैदानावर १७ वनडे सामने खेळले अाहेत. यातील १० वनडेत टीम इंडिया विजयी झाली. भारताने सात विदेशी टीमविरुद्ध या ठिकाणी सामने खेळले अाहेत.  

संभाव्य संघ
भारत : विराट काेहली (कर्णधार), राेहित शर्मा, शिखर धवन, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धाेनी, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मनीष पांडे, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकुर. 

न्यूझीलंड : विलियम्सन (कर्णधार), मार्टिन गुुप्तिल, काेलीन डी ग्रँडहाेम, राॅस टेलर, मॅट हेन्री, टाॅम लाॅथम, अॅडम मिल्ने, ईश साेढी, काेलीन मुन्राे, मिशेल सॅटनर, टीम साऊथी, जाॅर्ज वाॅर्कर.
बातम्या आणखी आहेत...