आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरमनप्रीत काैर खेळणार बिग बॅश लीगमध्ये!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या हरमनप्रीत काैरने अापल्या काैशल्यपूर्ण अाणि अव्वल कामगिरीच्या बळावर एका नव्या यशाला गवसणी घातली अाहे. तिची नुकतीच अाॅस्ट्रेलियातील महिलांच्या दुसऱ्या बिग बॅश टी-२० लीगसाठी निवड झाली अाहे. भारताची युवा क्रिकेटपटू हरमनप्रीत काैर बिग बॅशमध्ये सिडनी थंडर्सचे प्रतिनिधित्व करणार अाहे.

अशा प्रकारे अाॅस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅशसाठी निवड झालेली हरमनप्रीत काैर ही भारताची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. यासाठीची परवानगी तिला नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी दिली. त्यामुळे तिचा या लीगमध्ये खेळण्याचा मार्ग माेकळा झाला. शुक्रवारी बीसीसीअायच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली. भारताच्या २७ वर्षीय हरमनप्रीत काैरने अापल्या करिअरमध्ये अव्वल कामगिरी केली अाहे.

तिने नुकत्याच झालेल्या अाॅस्ट्रेलिया दाैऱ्यातही सरस खेळी केली. तिने या दाैऱ्यात ८९ धावांची सर्वाेत्तम खेळी केली. याशिवाय दाैऱ्यात धारदार गाेलंदाजी करताना एकूण ७ बळी घेतले. यात एकाच सामन्यातील चार विकेटचा समावेश अाहे.
बातम्या आणखी आहेत...