आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड समितीची आज बैठक; वनडेसाठी संघ निवड शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवनिर्वाचित सीनियर राष्ट्रीय निवड समितीची पहिली बैठक गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीत होत आहे. न्यूझीलंडविरुद्ध ५ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड ही समिती करणार आहे. अल्प अनुभवी असे संबोधण्यात येत असलेल्या या समितीची ही पहिलीच बैठक असल्यामुळे सर्वांच्या नजरा भारतीय संघाच्या निवडीवर लागल्या आहेत.

या समितीमधील सदस्यांपेक्षाच नव्हे, तर समितीच्या अध्यक्षांपेक्षाही अनुभवाने अधिक असलेले खेळाडू सध्या भारतीय संघातून खेळत आहेत. समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद संघनिवडीनंतर पत्रकारांशी बोलणार आहेत. बैठकीत सर्व सदस्य सहभागी होण्याची आशा आहे.
बातम्या आणखी आहेत...