आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादामुळे भारताचा झिम्बाब्वे दाैरा रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसारणाचा वाद आणि सातत्याच्या खेळातून आलेल्या थकव्यामुळे टीम इंडियाने आगामी झिम्बाब्वेचा दाैरा रद्द केला आहे. येत्या १० जुलैपासून भारतीय संघ झिम्वाब्वेचा दाैरा करणार हाेता. मात्र, आता हा दाैरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दाैर्‍यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन वनडे आणि दाेन टी-२० सामन्यांचे आयाेजन करण्यात आले हाेते. वर्षभरापासून टीम इंडियाने आतापर्यंत एकूण ३७ सामने खेळले आहेत. सध्या भारतीय संघ बांगलादेशमध्ये वनडे मालिका खेळत आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि टेन स्पाेर्ट्स यांच्यामध्ये मालिका प्रसारण करण्याच्या मुद्यावरून वाद सुरू हाेता. त्यामुळे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले हाेते. प्रसारणाच्या वादाशिवाय वर्षभरापासून सातत्याने खेळल्याने खेळाडूंना थकवा जाणवत आहे, याचाच विचार करून बीसीसीआयने दाैरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मागील आठ-नऊ महिन्यांपासून टीम इंडिया सातत्याने खेळत आहेत. आतापर्यंत एकूण ३७ सामने झाले आहेत. दाैरा रद्द करण्यामागे प्रसारणाचा वाद आणि थकव्याचे कारण देण्यात येत आहे.

आता लंकेसह मालिका
हा दाैरा रद्द झाल्याने भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिका हाेण्याचे संकेत मिळाले आहे. या दाेन्ही संघांमध्ये कसाेटी आणि वनडे मालिका हाेणार आहे. झिम्बाब्वेचा दाैरा रद्द केल्याने भारतीय संघातील खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध मालिकेच्या तयारीची संधी मिळेल.
बातम्या आणखी आहेत...