आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची "विजयी' आघाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झिम्बाब्वे विरूध्‍द दुसरा वन डे जिकल्‍यानंतर आनंद साजरा करतांना भारतीय खेळाडू - Divya Marathi
झिम्बाब्वे विरूध्‍द दुसरा वन डे जिकल्‍यानंतर आनंद साजरा करतांना भारतीय खेळाडू
हरारे - सलामीवीर अजिंक्य रहाणे (६३) आणि मुरली विजयच्या (७२) अर्धशतकी खेळीनंतर मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वरकुमारच्या विकेटच्या बळावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेवर ६२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना बाद २७१ धावा काढल्या. यानंतर यजमान झिम्बाब्वेला ४९ षटकांत २०९ धावांत गुंडाळून ६२ धावांनी शानदार विजय मिळवला. मालिकेतील तिसरा वनडे १४ जुलै रोजी होईल.

विजयासाठी २७२ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर सिबंदा धावांवर बाद झाला. मसकदजा आणि कर्णधार चिगुम्बुरा धावा काढून लवकर बाद झाले. झिम्बाब्वे संघ बाद ४३ असा संकटात सापडला असताना चिभाभाने ७२ धावा ठोकल्या. सीन विल्यम्सने २०, सिकंदर राजाने १८, मुतुम्बामीने ३२ तर क्रिमरने २७ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज अपयशी ठरले. चिभाभाशिवाय एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकला नाही. चिभाभाने ७२ धावा काढल्या. मात्र, त्याला विजय मिळवता आला नाही.
भारत धावा चेंडू
रहाणेझे. राजा गो. चिभाभा ६३ ८३
विजय झे. वॉलर गो. मॅडझिवा ७२ ९५
रायडू झे. वॉलर गो. राजा ४१ ५०
तिवारी झे. विटोरी गो. तिरिपानो २२ २६
उथप्पा त्रि. गो. मॅडझिवा १३ ११
बिन्नी झे. राजा गो. विटोरी २५ १६
केदार झे. मुतुम्बमी गो. मॅडझिवा १६ १३
हरभजन नाबाद ०५ ०४
अक्षर झे. राजा गो. मॅडझिवा ०१ ०२
भुवनेश्वरकुमार नाबाद ०० ००
अवांतर:१३. एकूण:५० षटकांत बाद २७१. गडीबाद होण्याचा क्रम :१-११२, २-१५९, ३-२०३, ४-२०५, ५-२३३, ६-२६४, ७-२६६, ८-२६९. गोलंदाजी:विटोरी ८-०-४७-१, तिरिपानो ९-०-४२-१, मॅडझिवा १०-०-४९-४, सीन विल्यम्स ५-०-२३-०, क्रिमर ५-०-३२-०, चिभाभा ५-०-२७-१, मसकदजा ४-०-२६-०, राजा ४-०-२५-१.
झिम्बाब्वेधावा चेंडू
सिबंदाझे. विजय गो. धवल ०२ १३
चिभाभा धावबाद ७२ १००
मसकदजा झे. उथप्पा गो. भुवनेश्वर ०५ ११
चिगुम्बुरा झे. रहाणे गो. भुवनेश्वर ०९ ०६
सीन विल्यम्स त्रि. गो. अक्षर २० ३७
राजा गो. उथप्पा गो. हरभजन १८ २२
मुतुम्बमी झे. अक्षर गो. बिन्नी ३२ ४१
क्रिमर झे. रहाणे गो. भुवनेश्वर २७ ४२
मॅडझिवा धावबाद ०० ००
तिरिपानो झे. अक्षर गो. भुवनेश्वर ०६ १३
विटोरी नाबाद ०८ ०९
अवांतर:१०. एकूण:४९ षटकांत सर्वबाद २०९. गडीबाद होण्याचा क्रम :१-२४, २-३१, ३-४३, ४-९५, ५-१३०, ६-१३२, ७-१८४, ८-१८६, ९-१९५, १०-२०९. गोलंदाजी:भुवनेश्वर कुमार १०-३-३३-४, धवल कुलकर्णी ९-१-३९-१, हरभजनसिंग १०-०-२९-१, स्टुअर्ट बिन्नी ७-०-४२-१, अक्षर पटेल १०-१-४०-१, मुरली विजय ३-०-१८-०.

बिन्नी पुन्हा लयीत
मधल्याफळीत स्टुअर्ट बिन्नीने चांगले योगदान दिले. त्याने हाणामारीच्या षटकात १६ चेंडंूत चौकार ठोकून वेगवान २५ धावा जमवल्या. इतरांनी निराशा केली. हरभजन धावांवर नाबाद राहिला.

रायडू, तिवारीचे योगदान
मधल्याफळीत अंबाती रायडूने ५० चंेडूंत चौकारांसह ४१ धावा काढल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या मनोज तिवारीने २६ चेंडूंत एका षटकारासह २२ धावा काढल्या. रॉबिन उथप्पा अवघ्या १३ धावा काढून बाद झाला. तो या वेळीही अपयशी ठरला.
भुवनेश्वर चमकला : भारताकडून मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वरने ३३ धावांत विकेट तर धवल, हरभजन, बिन्नी आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी गडी बाद केला. भुवनेश्वरने षटके निर्धाव टाकली.

रहाणे-विजयची शतकी भागीदारी
भारताने सलामीवीर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे मुरली विजय यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर दमदार सुरुवात केली. या दोघांनी २५.६ षटकांत ११२ धावांची सलामी दिली. रहाणेने ८३ चेंडूंचा सामना करताना चौकारांच्या साहाय्याने ६३ धावा केल्या. विजयने ९५ चंंेडूंंत चौकार आणि षटकाराने ७२ धावांचे योगदान दिले.

झिम्बाब्वेच्या सीन विल्यम्सला बाद केल्यानंतर अक्षर पटेलचे अभिनंदन करताना टीम इंडियाचे खेळाडू.