आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's Womens Cricket Team Lost Aginst New Zealand

आयसीसी महिला क्रिकेट चॅम्पियनशिप, न्यूझीलंडची भारतीय महिला संघावर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - आयसीसी महिला वनडे क्रिकेट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडने यजमान भारतावर ३ गड्यांनी विजय मिळवला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. मालिकेचे आणखी सामने शिल्लक आहेत.

प्रथम फलंदाजी करताना भारताने ४९.३ षटकांत सर्वबाद १६३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ४४.२ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. संघाच्या अवघ्या ९ धावा असताना कर्णधार व सलामीवीर एस. बटेस एका धावेवर तंबूत परतली. झुलन गोस्वामीने तिचा त्रिफळा उडवला. दुसरी सलामीवीर आर. एच. प्रीईस्टने २१, तर सत्तेथव्हाइटने २३ धावा जोडल्या. त्यानंतर आलेली एम. एल. ग्रीन भोपळाही फोडू शकली नाही. पाचव्या क्रमांकावर आलेली डेव्हिन आणि प्रेकिंग्ज या जोडीने पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. डेव्हिनने ६२ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकार खेचत सर्वाधिक ३३ धावा काढल्या. प्रेकिंग्जने ४४ चेंडूंत ३ चौकार लगावत ३० धावांचे योगदान दिले. बरोडमोरे अवघ्या एका धावेवर तंबूत परतली. कॅसपेरेकने १७ आणि पीटरसनने २२ चेंडूंत नाबाद २३ धावांनी नाबाद विजयी खेळी केली. भारताकडून झुलन गोस्वामीने १४ धावांत २ गडी बाद केले. ई. बिस्टने ३१ धावांत आणि गायकवाडने ३३ धावांत प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
कामिनीचे अर्धशतक व्यर्थ
तत्पूर्वी, भारताकडून सलामीवीर कामिनीने केलेली शानदार अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली. कामिनीने ९६ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार आणि एका षटकारासह ६१ धावा काढल्या. तिला बटेसने प्रीईस्टकरवी झेलबाद केले. स्मृती मानधनाने १२, तर मिताली राजने १३ धावा काढल्या. पी. जी. राऊत ८ धावांवर बाद झाली. पाचव्या क्रमांकावर आलेल्या हरमित कौरने ५० चेंडूंत ५ चौकार खेचत ३१ धावा जोडल्या. त्यानंतर आलेल्या ई. बिस्टच्या नाबाद १८ धावा वगळता इतरांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. न्यूझीलंडकडून बटेसने २१ धावांच्या मोबदल्यात ३ गडी टिपले.
संक्षिप्त धावफलक
भारत : ४९.३ षटकांत सर्वबाद १६३ धावा. न्यूझीलंड : ४४.२ षटकांत ७ बाद १६४ धावा.